Aamir Khan: आमिर खानने सांगितली टेनिस कोर्टवरील त्याच्या पहिल्या प्रेमाची कहाणी, “फक्त एक गोष्ट चांगली झाली की.. “

फिर ना ऐसी रात आयेगी या गाण्याच्या लॉन्च दरम्यान आमिर खानने त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि हृदयभंगाचा कधीही न ऐकलेला किस्सा सांगितला. आमिर खानने सांगितलं की, त्याचं पहिलं प्रेम दुसरं कोणीही नसून त्याची जवळची मैत्रीणच होती."

Aamir Khan: आमिर खानने सांगितली टेनिस कोर्टवरील त्याच्या पहिल्या प्रेमाची कहाणी, फक्त एक गोष्ट चांगली झाली की..
Aamir KhanImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:40 PM

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना दिसला आहे. आमिरचा पहिला चित्रपट 1988 मध्ये प्रदर्शित झाला. ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट एक उत्तम प्रेमकथा मानली जाते. खऱ्या आयुष्यातही आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आला. बुधवारी ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या आगामी चित्रपटातील ‘फिर ना ऐसी रात आएगी’ या गाण्याच्या लॉन्चिंगवेळी आमिर खानने त्याच्या पहिल्या प्रेमाची कहाणी सांगितली. आमिरने पहिल्यांदा झालेल्या हृदयभंगाची (first heartbreak) आठवण सांगितली आणि तो अनुभव वेदनादायी असल्याचं म्हटलं.

आमिर खानच्या बहुतेक चाहत्यांना माहित असेल की तो पहिल्यांदा रिना दत्तच्या प्रेमात पडला होता आणि तिच्याशी लग्न देखील केलं होतं. मात्र 2002 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि 2005 मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. फिर ना ऐसी रात आयेगी या गाण्याच्या लॉन्च दरम्यान आमिर खानने त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि हृदयभंगाचा कधीही न ऐकलेला किस्सा सांगितला.

टेनिस कोर्टवरील पहिल्या प्रेमाची कहाणी

आमिर खानने सांगितलं की, त्याचं पहिलं प्रेम दुसरं कोणीही नसून त्याची जवळची मैत्रीणच होती. मात्र तिला आमिरच्या भावनांची कल्पना नव्हती. “हा तो काळ होता जेव्हा मी टेनिस खेळायचो आणि तीसुद्धा माझ्यासोबत त्याच क्लबमध्ये होती. अचानक एके दिवशी मला कळलं की तिने तिच्या कुटुंबासह देश सोडला. मला खूप दु:ख झालं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला याबद्दल काहीही माहित नव्हतं,” असं त्याने सांगितलं. तो पुढे म्हणाला, “एकच गोष्ट चांगली झाली की मी खूप चांगला टेनिसपटू झालो. काही वर्षांनी मी राज्यस्तरीय स्पर्धेत टेनिस खेळलो आणि राज्यस्तरीय चॅम्पियन झालो.”

हे सुद्धा वाचा

आमिर खान आणि किरण राव यांचा गेल्या वर्षी 2021 मध्ये घटस्फोट झाला. रिना दत्तपासून आमिरला आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. तर किरणने मुलगा आझादला सरोगसीद्वारे जन्म दिला. आमिरचा पुढचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिरसोबतच किरण राव आणि वायकॉम18 स्टुडिओ करत आहेत. या चित्रपटात करीना कपूर, मोना सिंग आणि नागचैतन्य अक्किनेनी यांच्याही भूमिका आहेत.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.