Aamir Khanने घेतला होता फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय; कुटुंबीयांना सांगताच किरणला अश्रू अनावर
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्था अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या 'परफेक्ट' कामासाठी ओळखला जातो. आमिरने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. मात्र कोरोना महामारीच्या काळात त्याने फिल्म इंडस्ट्री (film industry) सोडण्याचा विचार केला होता.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्था अभिनेता आमिर खान (Aamir Khan) त्याच्या ‘परफेक्ट’ कामासाठी ओळखला जातो. आमिरने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. मात्र कोरोना महामारीच्या काळात त्याने फिल्म इंडस्ट्री (film industry) सोडण्याचा विचार केला होता. त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटासाठी केलेला हा कुठला तरी मार्केटिंग फंडा आहे, असं लोकांनी समजू नये म्हणून हा निर्णय त्याने जाहीर केला नसल्याचं सांगितलं. आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावने (Kiran Rao) त्याच्या या निर्णयाला विरोध केला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने याविषयी सांगितलं. फिल्म इंडस्ट्री सोडण्याबद्दल किरणला सांगितलं तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते, असं तो म्हणाला.
आमिरने सांगितलं की, त्याच्या निर्णयानंतर त्याने मुलगी आयरा खानसोबत काम करायला सुरुवात केली होती. तो म्हणाला की त्याच्या मुलांनीही त्याला आपला निर्णय चुकीचा असल्याचं सांगितले आणि जीवनात काम आणि कुटुंबामध्ये संतुलन राखण्याचा सल्ला दिला. “गेल्या 30 वर्षांत मी जेवढा वेळ मुलांसोबत घालवला नव्हता, तेवढा त्या महिन्यांत घालवला. त्यामुळे मला ते कंटाळलेसुद्धा होते”, असं तो मस्करीत म्हणाला.
“हा निर्णय ऐकून माझ्या कुटुंबीयांनाही धक्का बसला”
एबीपीला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “मी फिल्म सोडली होती. हे कोणालाच माहित नव्हतं. मी हे पहिल्यांदा तुमच्यासमोर सांगतोय, त्यामुळे तुम्हाला धक्का बसेल. मी माझ्या कुटुंबीयांना याविषयी सांगितलं होतं की आता यापुढे मी कोणतेही चित्रपट करणार नाही. मी अभिनयसुद्धा करणार नाही आणि निर्मितीक्षेत्रातही काम करणार नाही. मला यापैकी काहीच करायचं नाही. मला फक्त माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे. किरण आणि तिचे पालक, रीना आणि तिचे पालक, माझी मुलं, माझे कुटुंबीय यांच्यासोबत मला पुढचं आयुष्य घालवायचं आहे. माझा हा निर्णय ऐकून माझ्या कुटुंबीयांनाही धक्का बसला होता. हा निर्णय मी सर्वांसमोर जाहीर करणार होतो. पण लोकांना ते लाल सिंग चड्ढासाठी केलेला मार्केटिंग फंडा वाटला असता.”
“गेल्या दोन वर्षांत बरंच काही घडलं”
“म्हणून मी तो निर्णय जाहीर न करणंच योग्य असं ठरवलं. माझा हा चित्रपट तीन ते चार वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एकदा का हा चित्रपट प्रदर्शित झाला तर त्यानंतर मी तीन-चार वर्षांसाठी काही करतोय की नाही हे समजणार नाही. त्यानंतर मी इंडस्ट्री सोडेन आणि कोणाला त्याविषयी कळणार नाही, असा विचार केला. तीन महिने असेच निघून गेले. एके दिवशी, माझ्या मुलांनी मला समजावून सांगितलं की मी आयुष्यात संतुलन राखलं पाहिजे. माझ्या मनातून मी फिल्म इंडस्ट्री सोडली होती. मी चुकीचं करतोय असं मुलांनी आणि किरणने समजावलं. किरण रडली आणि म्हणाली, मी जेव्हा तुला पाहते, तेव्हा तू फिल्म्स जगतोस असं वाटतं. आता तू जे म्हणतोय, ते मला काहीच समजत नाहीये. गेल्या दोन वर्षांत बरंच काही घडलं आणि पुन्हा मी फिल्म इंडस्ट्रीत आलो”, असं आमिरने सांगितलं.
याआधीही एका मुलाखतीत आमिरने त्याच्या कुटुंबीयांना आणि मुलांना पुरेसा वेळ दिला नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याचा आगामी लाल सिंग चड्ढा हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा:
RRR: ज्युनियर एनटीआरच्या मुस्लीम लूकवरून झाला होता वाद; अखेर राजामौलींनी दिलं उत्तर
श्रेयस तळपदे ते मुक्ता बर्वे.. मराठी टीव्ही इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार