Aamir Khan | आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय…

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. त्याचे आधी रीना दत्तासोबत लग्न झाले होते. त्यानंतर दिग्दर्शक किरण रावसोबत त्याने लग्नगाठ बांधली.

Aamir Khan | आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय...
Aamir Khan
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 11:06 AM

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. त्याचे आधी रीना दत्तासोबत लग्न झाले होते. त्यानंतर दिग्दर्शक किरण रावसोबत त्याने लग्नगाठ बांधली. 3 जुलै रोजी किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी आता चर्चेत आली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आमिर एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर त्याच्या लग्नाची घोषणा करेल, असे म्हटले जात होते. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

आमिर तिसरे लग्न करतोय?

3 जुलै रोजी किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी आली. मात्र, त्याच्या जवळच्या सूत्राने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

आमिरसोबतच्या नात्यावर बोलली फातिमा

आमिर खानला डेट करत असल्याच्या अफवेवर फातिमा सना शेखने तिची प्रतिक्रिया दिली. ‘दंगल’ चित्रपटानंतर दोघांची नावे जोडली जात होती. याबाबत फातिमा म्हणाली होती, ‘काही अनोळखी लोक, ज्यांना मी कधीही भेटले नाही, ते माझ्याबद्दल लिहित आहेत. त्यांना सत्य काय आहे, हे देखील माहित नाही. त्यांचे लेखन वाचणाऱ्यांना वाटते की, मी चांगली माणूस नाही. मला वाटतं त्या लोकांना मी सांगायला हवं वकी, मला विचारा, मी तुम्हाला योग्य उत्तर देईन. मला त्रास होतो, कारण त्यांनी माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नये, असे मला वाटते.’

किरण-आमिरचे लग्न अन् घटस्फोट

आमिर खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलायचे झाले, तर 2001 मध्ये त्याची किरण रावशी भेट झाली. दोघांनी ‘लगान’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात आमिर खान नायक होता आणि किरण राव सहाय्यक दिग्दर्शक होती. 2002 मध्ये आमिरने पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट घेतला होता. यानंतर किरण आणि आमिर पुन्हा भेटले. दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांनी आझाद राव-खान अर्थात मुलाचे स्वागत केले. आमिर आणि किरण वेगळे झाले आहेत, पण मुलासाठी ते नेहमी एकत्र राहतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Kangana Ranaut Controversy | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, ‘भीकेचं स्वातंत्र्य’ वक्तव्याप्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

Happy Birthday Amruta Khanvilkar | ‘वाजले की बारा..’ म्हणत गाजवलं मराठी विश्वं तर, हिंदीतही अमृता खानविलकरला पाहण्यास प्रेक्षक ‘राझी’!

Special Story | केवळ ‘Two Indias’ नाही तर, वीर दास आणि वादांचं जुनं कनेक्शन, काहीना काही कारणांमुळे सतत राहिलाय चर्चेत!

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.