Kiran Rao Net Worth | आमिर खानशी घटस्फोटानंतरही करोडोंची मालकीण असणार किरण राव, जाणून घ्या एकूण संपत्तीबद्दल

केवळ आमिर खानची (Aamir khan) पत्नी इतकीच किरण रावची (Kiran Rao) ओळख नाही, परंतु तिने स्वत:चे वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. किरण एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. किरण आपल्या मेहनतीने या खास ठिकाणी पोहोचली आहे. तिची कमाई देखील एखाद्या बड्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

Kiran Rao Net Worth | आमिर खानशी घटस्फोटानंतरही करोडोंची मालकीण असणार किरण राव, जाणून घ्या एकूण संपत्तीबद्दल
किरण-आमिर
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 4:19 PM

मुंबई : केवळ आमिर खानची (Aamir khan) पत्नी इतकीच किरण रावची (Kiran Rao) ओळख नाही, परंतु तिने स्वत:चे वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे. किरण एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. किरण आपल्या मेहनतीने या खास ठिकाणी पोहोचली आहे. तिची कमाई देखील एखाद्या बड्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. बक्कळ कमाई करण्याबरोबरच किरण अनेक स्वयंसेवी संस्थांशीही संबंधित आहे. किरण राव यांचा नेट वर्थ, त्यांचे वय, करिअरची माहिती आणि वैयक्तिक जीवनाची माहिती जाणून घेण्यासाठी बरेच लोक इंटरनेट सर्च करतात (Aamir khan wife Kiran Rao Net Worth her income and property).

मीडिया रिपोर्टनुसार, किरण राव यांची एकूण मालमत्ता सुमारे 20 मिलिअन डॉलर्स म्हणजेच जवळपास 146 करोड इतकी आहे. किरण एक सर्वाधिक कमाई करणारी महिला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. आमिर खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याची एकूण मालमत्ता सुमारे 1434 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो तब्बल 85 कोटी रुपये आकारतो.

स्वतःची संपत्ती

किरणकडे स्वतःचे आलिशान घर आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र, आपल्याकडे किती घर आहेत आणि किती वाहने आहेत, हे किरणने अद्याप कुठेही जाहीर केलेले नाही. मीडिया रिपोर्टननुसार 2020मध्ये किरणची एकूण संपत्ती 20 दशलक्ष म्हणजेच 146 कोटी इतकी होती.

किरणची कारकीर्द

2005मध्ये आमिर खान आणि किरण राव यांचे लग्न झाले. आता या दोघांनाही एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आझाद आहे. किरणच्या कामाविषयी बोलायचे तर ती एक निर्माती, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहे. तिने ‘जाने तू… या जाने ना’, ‘धोबी घाट’, ‘दंगल’, ‘तलाश’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘पिपली लाइव्ह’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. यासह तिने ‘धोबी घाट’चे दिग्दर्शनही केले आहे. किरण ही बॉलिवूड स्टार्स वाईफमधील सर्वात यशस्वी महिला आहे.

लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोटाचा निर्णय

आमिर खानने पहिली पत्नी रिनासोबत काडीमोड घेऊन किरण रावसोबत लगीनकाठ बांधली होती. लगान सिनेमावेळी आमिर आणि किरण रावचं सुत जुळलं होतं. “गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

(Aamir khan wife Kiran Rao Net Worth her income and property)

हेही वाचा :

Aamir Khan Kiran Rao Divorce: आमिर खान- प्रेम, घटस्फोट, प्रेम आणि तीन मुलांचा बाप, काय काय घडलं स्टारच्या आयुष्यात? वाचा सविस्तर!

रक्ताने पत्र लिहिलं, पळून जाऊन लग्न ते घटस्फोट, आमिरच्या पहिल्या लग्नाची कहाणी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.