Abhishek-Aishwarya Love Story | चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा कशी होती अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकथा…

‘विश्वसुंदरी’ ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील परफेक्ट कपलपैकी एक आहेत. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यावरून नजर हटवूच शकत नाही.

Abhishek-Aishwarya Love Story | चित्रपटात काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले, वाचा कशी होती अभिषेक-ऐश्वर्याची प्रेमकथा...
Aishwarya-Abhishek
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 12:55 PM

मुंबई : ‘विश्वसुंदरी’ ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील परफेक्ट कपलपैकी एक आहेत. जेव्हा जेव्हा दोघे एकत्र येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्यावरून नजर हटवूच शकत नाही. ऐश्वर्या आणि अभिषेक पूर्वी खूप चांगले मित्र होते. नंतर हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ऐश्वर्या आणि अभिषेक पहिल्यांदा 1999 मध्ये त्यांच्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ चित्रपटाच्या फोटोशूट दरम्यान भेटले होते. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ढाई अक्षर प्रेम के’ हा पहिला चित्रपट आम्ही एकत्र केला होता. त्यावेळी ऐश्वर्याला पाहून मी तिच्यासाठी वेडाच झालो होता.

मात्र, प्रेम सुरू होण्यापूर्वीच दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. या चित्रपटानंतर दोघेही रमेश सिप्पी यांच्या ‘कुछ ना कहो’ या चित्रपटात एकत्र दिसले. मात्र, ‘उमराव जान’ या चित्रपटातून दोघांमधील प्रेमाची सुरुवात झाली. अभिषेकने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यावेळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती आणि आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यावेळी विश्वालाच आम्हा दोघांना एकत्र आणायचे होते.

2007 मध्ये अभिषेक त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या हॉटेल रूमच्या बाल्कनीत बसून अभिषेकने ऐश्वर्या रायसोबत लग्नाचा विचार केला. यानंतर त्याने ठरवले की, तो ऐश्वर्याला आता लग्नासाठी विचारणार आहे.

प्रपोजची कल्पना कशी सुचली?

या प्रपोजलचे वर्णन करताना अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी न्यूयॉर्कमध्ये माझ्या चित्रपटाचे शूटिंग करत होतो, तेव्हा मी माझ्या हॉटेलच्या खोलीच्या बाल्कनीत बसलो होतो, तेव्हा माझ्या मनात आले की, माझे आणि ऐश्वर्याचे लग्न झाले तर कसे? ते चांगले होईल का? यानंतर मी ऐश्वर्याला त्याच बाल्कनीत नेले आणि तिला विचारले की तू माझ्याशी लग्न करशील का?’

ऐश्वर्यानेही लगेच होकार दिला आणि 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केले. दोघांचे लग्न एखाद्या शाही लग्नापेक्षा कमी नव्हते. या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यानंतर 2011 मध्ये दोघेही आराध्याचे पालक झाले.

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याची खास गोष्ट म्हणजे दोघेही नेहमीच एकमेकांचा आदर आणि समर्थन करतात. अनेकवेळा दोघांपैकी एकाला ट्रोल केले जाते तेव्हा दुसरा त्याला उत्तर द्यायला नेहमीच तयार असतो.

हेही वाचा :

Ankita Lokhande | लगीनं घटीका समीप आली, करा हो लगीन घाई! अंकिता लोखंडे बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकणार!

Happy Birthday Ishaan Khatter | बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, दुप्पट वयाच्या अभिनेत्रीसोबत ऑनस्क्रीन रोमान्समुळे चर्चेत ईशान खट्टर!

Actor Sikander kher : अनुपम खेरसारखी प्रसिद्धी नाही मात्र तगड्या अभिनयातून जिंकली प्रेक्षकांची मनं, वाचा सिकंदर खेरबद्दल खास गोष्टी

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.