प्रेम असावं तर अभिषेक – ऐश्वर्या यांच्यासारखं… अभिनेत्याच्या नव्या पोस्टमध्ये दिसली दोघांची केमिस्ट्री
Abhishek Bachchan याची इन्स्टाग्रामवरील नवीन पोस्ट पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल अभिनेता पत्नी ऐश्वर्या राय हिच्यावर किती प्रेम करतो... अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Abhishek Bachchan – Aishwarya Rai : अभिनेता अभिषेक बच्चन (abhishek bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची लव्हस्टोरी आज प्रत्येकाला माहिती आहे. अभिषेक – ऐश्वर्या कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. बॉलिवूडच्या प्रसिद्ध कपलपैकी एक कपल म्हणजे अभिषेक – ऐश्वर्या…, दोघे कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता देखील अभिषेक बच्चन याने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या अभिनेता पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांच्यासोबत मालदीव याठिकाणी सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सुट्ट्यांचे काही फोटो अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
अभिषेक बच्चन याने काही फोटो इन्स्टाग्राम पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ऐश्वर्या हिचा देखील एक फोटो आहे. अभिनेत्याने कँडल लाईट डीनरदरम्यानचे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये सर्वात शेवटी अभिनेत्याने ऐश्वर्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो पोस्ट करत अभिषेक बच्चन याने कॅप्शनमध्ये, ‘काही आणखी सुंदर दृष्य… विशेषतः शेवटचा…’ शिवाय अभिनेत्याने @stregismaldives यांचे आभार देखील मानले.
सध्या अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात असलेली केमिस्ट्री अभिनेत्याच्या पोस्टमधून दिसून येत आहे. अभिषेक याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ऐश्वर्या हिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.
View this post on Instagram
अभिषेक वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासोबत मालदीव याठिकाणी पोहोचला आहे. (abhishek bachchan birthday) अभिषेक बच्चन त्याच्या आयुष्यातील गोष्टी चाहत्यांसोबत मोकळेपणाने शेअर करतो. अभिनेता पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची ओळख ‘धूम’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. (abhishek bachchan birthday videos)
२० एप्रिल २००७ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर १६ नोव्हेंबर २०११ मध्ये ऐश्वर्याने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे. स्टारकिड्स म्हणून आराध्या देखील प्रचंड लोकप्रिय आहे. आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. (abhishek bachchan daughter) . ऐश्वर्या राय देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय अनेक ठिकाणी अभिनेत्री लेक आराध्या हिच्यासोबत दिसत.