‘रंग दे बसंती’च्या ‘या’ भूमिकेसाठी अभिषेक-फरहानचा नकार, हृतिक रोशनची मनधरणी करण्यासाठी घरी गेलेला आमिर खान!
चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakesh Omprakash Mehra) यांचा ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) हा सुपरहिट चित्रपट कोण विसरू शकतं?
मुंबई : चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा (Rakesh Omprakash Mehra) यांचा ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) हा सुपरहिट चित्रपट कोण विसरू शकतं? एका अनोख्या आणि नवीन विषयावर बनवलेला हा चित्रपट आजही चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत, चित्रपट रिलीज झाल्याच्या इतक्या वर्षांनंतर, निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी खुलासा केला की, आमिर खानने (Aamir Khan) बॉलिवूडच्या ‘रंग दे बसंती’ या आयकॉनिक चित्रपटात हृतिक रोशनला (Hritik Roshan) कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
चित्रपट निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, आमिरने हृतिकला ‘करण सिंघानिया’ची भूमिका करण्यासाठी खूप मनधरणी केली होती. पण, तरीही हृतिक सहमत झाला नाही आणि त्याने हा चित्रपट नाकारला. अशा परिस्थितीत, शेवटी चित्रपटात ही विशेष भूमिका दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला देण्यात आली, जी चाहत्यांदेखील खूप आवडली.
राकेशने केला मोठा खुलासा
सध्या दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा हे त्यांचे आत्मचरित्र ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ मुळे खूप चर्चेत आहेत. राकेशच्या या पुस्तकात त्याच्या सिनेमापासून वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्व काही सांगितले गेले आहे. या पुस्तकात राकेशने ‘रंग दे बसंती’ चित्रपटादरम्यान आलेल्या आव्हानांचाही उल्लेख केला आहे.
‘रंग दे बसंती’च्या ‘करण सिंघानिया’च्या कास्टिंगवर या पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये दिग्दर्शकाने खुलासा केला की, त्याने या भूमिकेसाठी फरहान अख्तर (Farhan Akhtar), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि हृतिक रोशनसह (Hritik Roshan) आणखी काही कलाकारांशी संपर्क साधला होता. मात्र, सर्वांनी ही भूमिका नाकारली.
हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, यामध्ये राकेशने सांगितले आहे की, करण सिंघानिया या महत्त्वाच्या भूमिकेला कितीतरी मोठ्या स्टार्सनी नकार दिला होता. ही भूमिका प्रथम फरहान अख्तरला ऑफर करण्यात आली होती. हा तो काळ होता, जेव्हा फरहानने कोणत्याही चित्रपटात पदार्पण केले नव्हते आणि अभिनेत्याने ही भूमिका त्या वेळी नाकारली होती. अगदी अभिषेक बच्चननेही या भूमिकेतून माघार घेतली.
रिपोर्टनुसार, आमिर खाननेही या भूमिकेच्या कास्टिंगसाठी पुढाकार घेतला होता. या भूमिकेसाठी आमिर हृतिकच्या घरीही गेला होता. आमिरने विशेषतः हृतिकला ही भूमिका करण्यास सांगितले, पण अभिनेत्याने नकार दिला. अशा परिस्थितीत शेवटी सिद्धार्थला भूमिका मिळाली. या चित्रपटाद्वारे सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.
(Abhishek,Farhan, Hrithik Roshan refuses to play Karan Singhania in Rang De Basanti)
हेही वाचा :
‘सॉरी अम्मा, अब्बा…’, जखमी झालेल्या सारा अली खानने का मागितली कुटुंबाची माफी?
किशोर कुमारांची झाली होती 4 लग्न, त्यातील एक आता मिथुन चक्रवर्तींची पत्नी!