Raju Srivastava | राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने दिली तब्येतीबाबत नवीन अपडेट, जाणून घ्या आता राजू यांची तब्येत नेमकी कशी?
राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने सांगितले की, एम्समधील डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत आहेत. मात्र, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांना अजून शुद्ध आलेली नाहीयं.
मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे मृत्यूशी झुंज देत असून त्यांच्यावर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या तब्येती विषय दररोज वेगवेगळे अपडेट येतात. राजू श्रीवास्तव यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अजूनही राजू श्रीवास्तव हे आयसीयूमध्ये उपचार (Treatment) घेत आहेत. राजू यांच्यावर गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. नुकताच राजू श्रीवास्तव यांचे मॅनेजर (Manager) यांनी त्यांच्या तब्येती विषयी नवीन अपडेट दिले असून त्यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांची तब्येत आता स्थिर असून हळूहळू ते बरे होत आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या तब्येती विषयीच्या नवीन अपडेटमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसतोयं.
राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने सांगितले की…
राजू श्रीवास्तव यांच्या मॅनेजरने सांगितले की, एम्समधील डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. डॉक्टर त्यांची विशेष काळजी घेत आहेत. मात्र, राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर असून त्यांना अजून शुद्ध आलेली नाहीयं. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की ते एक सेनानी आहे आणि मृत्यूला हरवून लवकरच परतणार आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबाने चाहत्यांना तब्येत सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका, राजू राजू श्रीवास्तव यांच्या बंधूंचे आवाहन
राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीसंदर्भात अनेक अफवा पसरवणे सुरू आहे. मात्र, यामध्ये कुठल्याच प्रकारचे सत्य नसल्याचे राजू श्रीवास्तव यांचे बंधू दिपू श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. काल परवा अशा बातम्या येत होत्या की, राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात येत आहे. मात्र, त्यासंदर्भात खरी माहिती राजू श्रीवास्तव यांच्या बंधूंनी दिलीयं. राजू यांच्या भावाने सांगितले की, सध्या त्यांना व्हेंटिलेटरवरून काढले जात नाही. एवढेच नाही तर अफवा पसरवू नका, असेही आवाहनही त्यांनी केले.