Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज

जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी 'अटॅक' (Attack) चित्रपटामुळे चर्चेत आहे. जॉनसोबत जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) मुख्य भूमिकेत आहेत. या अॅक्शन चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे.

Attack : जानेवारीत होणार 'अटॅक'! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज
जॉन अब्राहम
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 12:25 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी ‘अटॅक’ (Attack) चित्रपटामुळे चर्चेत आहे. जॉनसोबत जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.

मोस्ट अवेटेड रिलीजपूर्वी निर्मात्यांनी मोस्ट अवेटेड असलेल्या या अॅक्शन चित्रपटाचा टिझर रिलीज केला आहे. जॉन या चित्रपटात अॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटाची कथा रेंजर ऑफिसरने हाती घेतलेल्या मिशनवर आधारित आहे.

अॅक्शन आणि ड्रामा ‘अटॅक’ हा अॅक्शन आणि ड्रामा मुव्ही आहे. निर्मात्यांनी 1 मिनिट 23 सेकंदाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरची सुरुवात एका गाण्याने होते, ज्यामध्ये आपण जॉनला एका ढासळलेल्या सैनिकाच्या रूपात पाहतो. त्याला दहशतवादाचा नायनाट करायचा आहे. टीझरमध्ये जॉन एका किलिंग मशीनच्या भूमिकेत दिसत आहे. जॅकलिनची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. रकुल प्रीत सिंग एक वैज्ञानिकाच्या भूमिकेत असून ती लक्ष वेधून घेते.

‘सुपर सॉलिडरचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा’ जॉनने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काल जॉनच्या इन्स्टाग्राम(Instagram)वरून सर्व जुने फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांचे अकाउंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र सध्या त्याच्या अकाऊंटवरून चित्रपटाचा टिझर शेअर करून सर्व प्रकारच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. टीझर शेअर करताना जॉनने म्हटले आहे, की भारताच्या पहिल्या सुपर सॉलिडरचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज व्हा. याचा टीझर रिलीज झाला आहे. अटॅक 28 जानेवारी 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

जानेवारीत प्रदर्शन जॉनने टीझर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. जॉनचा सुपर-कॉप अवतार चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या चित्रपटात प्रकाश राज (Prakash Raj) आणि रत्ना पाठक शाह (Ratna Pathak) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट लक्ष्य राज आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे आणि पेन (PEN)स्टुडिओ, जॉन अब्राहम एन्टरटेनमेंट आणि अजय कपूर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मिती केली आहे. 28 जानेवारी 2022 रोजी ‘अटॅक’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, वर्क फ्रंटवर जॉन ‘एक व्हिलन 2’मध्ये दिसणार आहे. याशिवाय शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ‘पठाण’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार आहेत.

Pushpa The Rise | प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा नवा विक्रम!

Ti Parat Aaliye | ‘ती परत आलीये’ म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? लवकरच होणार ‘ती’चा पर्दाफाश

Video | नोरा फतेहीच्या ऑफ शोल्डर ड्रेसने घोटाळाच केला! थेट कॅमेरासमोरच अभिनेत्री करू लागली असं काही की…

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.