Amir Khan Kiran Rao Divorce: हा शेवट नव्हे तर सुरुवात; आमिर खान-किरण रावच्या मुलाचा ताबा आता कोणाकडे?
Amir Khan Kiran Rao Divorce | आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता.
मुंबई: बॉलिवूडमधील बहुचर्चित जोड्यांपैकी एक असलेल्या आमिर खान आणि किरण राव यांनी 15 वर्षांच्या सहजीवनानंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र, आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव यांनी आपण आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे म्हटले आहे. घटस्फोट हा म्हणजे शेवट नव्हे तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असल्याचेही दोघांनीही सांगितले आहे. (Bollywood actor Aamir Khan and Kiran Rao will raise son Azad together after divorce)
मात्र, या सगळ्यानंतर आमिर आणि किरण राव यांचा लहान मुलगा आझाद याचा ताबा कोणाकडे जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु, संयुक्त निवेदनात म्हटल्याप्रमाणे आमिर खान आणि किरण राव आझादचा संयुक्तपणे सांभाळ करणार आहेत. आझादचे संगोपन आणि पालनपोषण आम्ही एकत्रच करू, असे आमिर व किरण रावने म्हटले आहे.
“We began a planned separation some time ago and now feel comfortable to formalize it. We remain devoted to our son Azad, who we will nurture and raise together. We will also work as collaborators on films, Pani Foundation, & other projects,” the couple said in a joint statement pic.twitter.com/P54bSIisO8
— ANI (@ANI) July 3, 2021
‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने 28 डिसेंबर 2005 सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता. आमिर खानला पहिली पत्नी रियापासून आयला आणि जुनेद ही दोन मुलं आहेत.
संबंधित बातम्या:
(Bollywood actor Aamir Khan and Kiran Rao will raise son Azad together after divorce)