नवी दिल्ली : तेलुगु अभिनेते आणि ज्युनिअर एनटीआर यांचे भाचे तसेच तेलुगु देसम पार्टीचे नेते नंदामुरी तारक रत्न यांचं निधन झालं आहे. वयाच्या 39 व्या वर्षी नंदामुरी यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. नंदामुरी यांना गेल्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. अखेर काल त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनामुळे दाक्षिणात्य सिनेमासृष्टीतून दु:ख व्यक्त केलं जात आहे. प्रसिद्ध अभिनेते अल्लु अर्जुन, चिरंजीवीसहीत अनेक अभिनेत्यांनी आणि नंदामुरी यांच्या चाहत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
27 फेब्रुवारी नंदामुरी हे आंध्रप्रदेशातील चित्तुर येथील एका राजकीय रॅलीत सहभागी झाले होते. कुप्पम येथे तेदेपाचे महासचिव नारा लोकेश यांच्या राज्यव्यापी पदयात्रेत ते सहभागी झाले होते. त्यावेळी रॅली सुरू असताना नंदामुरी अचानक पडले होते. हृदयविकाराचा झटका आल्याने ते अचानक कोसळले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बंगळुरूच्या नारायण हृदयालय रुग्णालयात आणण्यात आले होते.
त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. रुग्णालयात ते तब्बल 23 दिवस मृत्यूशी संघर्ष करत होते. काल त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.
नंदामुरी हे प्रसिद्ध अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांचे नातू होते. तसेच नंदामुरी मोहन कृष्ण यांचे चिरंजीव होते. नंदामुरी यांच्या निधनानंतर टॉलिवूड अभिनेत्यांनी सोशल मीडियावरून दु:ख व्यक्त केलं आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू, जी. किशन रेड्डी आदी राजकीय नेत्यांनीही नंदामुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलं आहे.
Deeply saddened to learn of the
tragic premature demise of #NandamuriTarakaRatna
Such bright, talented, affectionate young man .. gone too soon! ? ?
Heartfelt condolences to all the family members and fans! May his Soul Rest in Peace! శివైక్యం ?? pic.twitter.com/noNbOLKzfX— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) February 18, 2023
नंदामुरी यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी तेलुगु सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. ओकाटो नंबर कुर्राडु हा त्यांचा पहिला सिनेमा होता. मात्र, त्यांना आपले चुलत भाऊ ज्युनिअर एनटीआर यांच्यासारखं फिल्मी जगात मोठं यश मिळालं नाही.
नंदामुरी तारक रत्न यांचं अचानक निधन झाल्याचं ऐकून खूप दु:ख झालं. उज्ज्वल प्रतिभावंत, स्नेही, तरुण अभिनेता फार लवकर गेला. त्याच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो, असं ट्विट करत चिरंजीवीने शोक व्यक्त केला आहे.