33 वर्षानंतर अखेर अनिल कपूरने बोलून दाखवली मनातील खदखद, वाचा नेमक्या कोणत्या गोष्टीचा होतो आहे पश्चाताप…

अनुपम खेर आणि अनिल कपूर हे मॉर्निंग वॉकला जात असताना यश चोप्रा यांच्या घरासमोर थांबले होते. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते आहे की, अनुपम खेर आणि अनिल कपूर जुन्या आठवणी ताज्या करत आहेत.

33 वर्षानंतर अखेर अनिल कपूरने बोलून दाखवली मनातील खदखद, वाचा नेमक्या कोणत्या गोष्टीचा होतो आहे पश्चाताप...
Follow us
| Updated on: Sep 14, 2022 | 11:56 AM

मुंबई : यश चोप्रा दिग्दर्शित चांदनी (Chandni) या चित्रपटाला आज तब्बल 33 वर्षे पूर्ण होत आहेत. हा चित्रपट 14 सप्टेंबर 1989 रोजी प्रदर्शित झाला होता. यासंदर्भातील एक खास व्हिडीओ अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अनुपम खेर (Anupam Kher) यांच्यासोबत अनिल कपूर देखील आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिले की, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असताना मी आणि अनिल कपूर यश चोप्रा यांच्या घरासमोर थांबलो…आता अनुपम खेर आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे.

इथे पाहा अनिल कपूर यांनी शेअर केलेली पोस्ट

अनुपम खेर आणि अनिल कपूर यांनी जुन्या आठवणी ताज्या केल्या

अनुपम खेर आणि अनिल कपूर हे मॉर्निंग वॉकला जात असताना यश चोप्रा यांच्या घरासमोर थांबले होते. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते आहे की, अनुपम खेर आणि अनिल कपूर जुन्या आठवणी ताज्या करत आहेत. इतकेच नाही तर व्हिडीओच्या शेवटी दिसते आहे की, अनुपम खेर यांनी यश चोप्रा याच्या घराचे आशीर्वाद घेत दर्शनही घेतले. अनुपम खेर म्हणाले की, यशजींनी आमच्या विशेषतः माझ्या आयुष्यात खूप योगदान दिले आहे. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद… आज चांदनीने 33 वर्षे पूर्ण केली आहेत.

अनिल कपूरने सोशल मीडियावर सांगितली 33 वर्ष अगोदर केलेली मोठी चूक

अनुपम खेर यांची ही पोस्ट आता अनिल कपूरने रिशेअर केली आहे. हा व्हिडीओ ट्विटवर शेअर करताना अनिल कपूर यांनी लिहिले की, चांदनी चित्रपट नाकारल्याचा मला अजूनही पश्चात्ताप आहे. चांदनीला 33 वर्षे झाली. हा चित्रपट मला यशजींनी ऑफर केला होता, पण मी तो चित्रपट करण्यास नकार दिला, यांची मला अजूनही मोठी खंत आहे. श्री जी, ऋषी जी, विनोद जी आणि यश जी… आम्ही तुम्हा सर्वांना खूप मिस करतो, अशाप्रकारची पोस्ट अनिल कपूरने शेअर केलीयं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.