B’day Celebration | ‘जुग जुग जियो’ च्या सेटवर अनिल कपूर यांचा 67 वा वाढदिवस साजरा! 

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

B’day Celebration | 'जुग जुग जियो' च्या सेटवर अनिल कपूर यांचा 67 वा वाढदिवस साजरा! 
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 10:51 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनिल कपूर हे सध्या पंजाबमध्ये त्याच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावेळी त्यांनी आपला वाढदिवस चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवसासाठी पत्नी सुनीता कपूर (Sunita Kapoor), वरुण धवन (Varun Dhawan), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) हे देखील उपस्थित होते. वरुण आणि कियारा यांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. (Actor Anil Kapoor is celebrating his 67th birthday today)

वाढदिवसाच्या दिवशी अनिल कपूर यांनी सेटवर एक छोटी पार्टी दिली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये अनिल कपूर केक कापताना दिसत आहेत. अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहते रात्रीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. सोनम कपूरला (Sonam Kapoor) वाढदिवसाच्या दिवशी वडिलांची खूप आठवण येत आहे.

सोनमने अनिल कपूर आणि तिचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे आणि सोनम म्हणते की, सकारात्मक, दयाळू व्यक्ती आहात तुम्ही आणि तुमचा या गोष्टी आमच्यात आल्या आहेत. यामुळे आम्ही आधिक भाग्यवान आहोत मला तुमची खूप आठवण येत आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवशीनिमित्त एके वर्सेज एके हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा कॉमिक थ्रिलर चित्रपट आज नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अनिल कपूरसोबत अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांना क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अनिल कपूर यांनी वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली होती. तुम्हाला कुठल्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर त्यांनी सचिन तेंडूलकरचे नाव घेतले. सोबतच ते सचिनचे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Rinku Rajguru | लॉकडाऊनचा ‘आर्ची’ला फटका, रिंकू राजगुरु लंडनमध्ये अडकली

कंगना रनौत प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडून आयुक्त इकबाल सिंह चहल यांना समन्स

(Actor Anil Kapoor is celebrating his 67th birthday today)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.