मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या (Armaan Kohli) अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयत. एनडीपीएस प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अरमानला जामीन नाकारला आहे. अरमान ऑगस्ट 2021 पासून न्यायालयीन कोठडीत आहे. अरमानला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा एनसीबीने सांगितले की, अरमानवर ड्रग्ज सेवनाचे अनेक मोठे आरोप आहेत. एनसीबीने अरमानला अटक करण्यापूर्वी त्याच्या घरावर छापा टाकला होता आणि त्यादरम्यान त्याच्या घरी काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते.
चौकशीदरम्यान अभिनेत्याला याबाबत विचारले असता, त्याने कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. चौकशीनंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला त्यांच्या कार्यालयात नेले आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
Actor Armaan Kohli’s bail application has been rejected by the Bombay High Court.
He was arrested by Narcotics Control Bureau in a drugs case
(file pic) pic.twitter.com/9hbyRHFWnE
— ANI (@ANI) December 20, 2021
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून NCB बॉलिवूडवर लक्ष ठेवून आहे. ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत अनेक सेलेब्सची नावे समोर आली आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी अनेक सेलिब्रिटींना अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्ती, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, काही दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांना जामीन मिळाला.
याशिवाय दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांचीही नावे ड्रग्ज प्रकरणात आली होती. मात्र, त्यांच्याबाबत कोणताही पुरावा मिळू शकला नाही. मात्र, अरमान या प्रकरणात अडकला असून, त्याला सध्या जामीन मिळण्याची शक्यता नाही.
अरमान हा दिग्दर्शक राज कुमार कोहली आणि अभिनेत्री निशी यांचा मुलगा आहे. मात्र, तो इंडस्ट्रीत आपले मोठे नाव कमावू शकला नाही. 1992 मध्ये ‘विरोधी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या अरमानने अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. मात्र, सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात अरमानने खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.
अरमान ‘बिग बॉस’मध्येही दिसला होता. तो हा शो जिंकू शकला नाही, पण या शोमधून त्याला लोकप्रियता मिळाली. अरमानचा पुढील वर्षी ‘नो मीन्स नो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा एक इंडो पोलिश रोमँटिक थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात अरमानशिवाय गुलशन ग्रोवर आणि शरद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.