Video | ‘ते निघून गेले पण त्यांच्या आठवणी राहतील…’, दिलीप कुमारांच्या आठवणीने भावूक झाले धर्मेंद्र
अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना या जगातून जाऊन आता दोन दिवस उलटले आहेत. त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानणारे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Deol) त्यांची आठवण आल्यावर पुन्हा पुन्हा भावनिक होतात.
मुंबई : अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना या जगातून जाऊन आता दोन दिवस उलटले आहेत. त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानणारे अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra Deol) त्यांची आठवण आल्यावर पुन्हा पुन्हा भावनिक होतात. काही काळापूर्वी त्यांनी दिलीप कुमारांच्या आठवणी जागवत आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी दिलीप साहेबांना मोठ्या पडद्यावर पाहिल्यानंतर आपण अभिनेता कसे झालो आणि आपण कसे आरशात बघून स्वतःला विचारायचो की मी दिलीपकुमार बनू शकेन का?, याबद्दल सांगितले (Actor Dharmendra Deol Share memories of late actor Dilip Kumar).
आपल्या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र असे म्हणतात की, ‘मी काम करायचो… सायकलवर जायचो-यायचो.. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये स्वतःची झलक पाहायचो… रात्री उठून आरशात पाहायचो आणि विचारायचो की, मी दिलीप कुमार होऊ शकतो का?’
धर्मेंद्रने आपल्या व्हिडीओत हे स्पष्ट केले आहे की, दिलीप कुमारपेक्षा मोठा अभिनेता होण्याचा ते कधीही विचार देखील करू शकत नाहीत. म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप साहेबांना ‘अभिनय सम्राट’ असे नाव देण्यात आले आहे.
पाहा धर्मेंद्र यांचे ट्विट
Dosto, Dalip Sahab ki rukhsati par … mere …aap ke runde runde jazbaat ye … uss Azeem fankar… uss neek rooh insaan ko…. ek Shradhanjali hai ?. woh chale gaye ..un ki yaadein na ja payegi? pic.twitter.com/ZEc1CNs8xL
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 9, 2021
दिलीप कुमार यांच्या मृत्यूची बातमी मिळताच, धर्मेंद्र यांनी टीव्ही 9वर फोनद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हटले होते की, ‘आज माझ्या मोठ्या भावाने या जगाचा निरोप घेतला आहे. दिलीप साहेबांनी मला असं कधीच वाटू दिलं नाही की मी त्यांचा सख्खा धाकटा भाऊ नाही. ते मला सेटवर सोबत घेऊन जात असत आणि नेहमीच मला मोठ्या भावासारखे प्रेम करत असत.’
मोठ्या भावाच्या आठवणीने धायमोकलून रडले धर्मेंद्र
दिलीपकुमार यांचा पार्थिव त्यांच्या पाली हिलच्या घरात पोहोचताच धर्मेंद्र तातडीने त्याच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी दिलीप साहेबांच्या जाण्याने खचलेल्या सायरा बानो यांचे सांत्वन केले. सायरा बानोचे दु:ख पाहून स्वतः धर्मेंद्र आपले अश्रू रोखू शकले नाहीत आणि दिलीप कुमार यांचा चेहरा धरून रडू लागले.
दिलीप कुमारांनी डोळे मिचकावले?
त्यांना रडताना पाहून सायरा बानो म्हणाल्या की, धरम बघ साहेब डोळे मिचकावत आहेत. कारण दिलीप कुमार आपल्याला सोडून गेले ही गोष्ट स्वीकारण्यास सायरा बानो यांचे मन तयार नव्हते. धर्मेंद्र यांनी त्यादिवशी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘सायरा बानो यांचे हे बोलणे ऐकून जणू माझा जीव गलबलला. देव माझ्या मोठ्या भावाला स्वर्गात सुखात ठेवो.’
Saira ne jab kaha. “ Dharam , dekho Sahab ne paplak jhapki hai “ Dosto , jaan nikal gai meri. Maalik mere pyaare bhai ko jannat naseeb kare? pic.twitter.com/yrPP6rYJqX
— Dharmendra Deol (@aapkadharam) July 7, 2021
(Actor Dharmendra Deol Share memories of late actor Dilip Kumar)
हेही वाचा :
क्रिती सेनॉनने सोशल मीडियावर शेअर केला ‘मिमि’चा लूक, चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता!