मी बदला घेण्यासाठी परत आलो…म्हणणारे केआरके आता म्हणतात मी सर्व विसरलो, वाचा नेमके काय घडले?

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'मीडिया नवीन स्टोरी तयार करत आहे. मी सुखरूप माझ्या घरी परतलो आहे. मला कोणाकडून बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते सर्व मी विसरलो आहे.

मी बदला घेण्यासाठी परत आलो...म्हणणारे केआरके आता म्हणतात मी सर्व विसरलो, वाचा नेमके काय घडले?
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 11:57 AM

मुंबई : अभिनेता कमाल आर खान (Kamaal R. Khan) पुन्हा एकदा ट्विटरवर सक्रिय झालायं. कमाल आर खान अर्थात केआरकेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती. आता केआरकेला जामिनावर सोडण्यात आले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी अटक (Arrested) केली होती. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटवर एक पोस्ट शेअर (Share post) केलीयं. यामध्ये केआरकेने लिहिले की, मी माझ्या घरी सुखरूप परतलोयं….तसे कमाल आर खान आणि वाद हे समीकरण मुळात नवे नाहीये. केआरके नेहमीच ट्विट करून मोठा वाद निर्माण करतात.

इथे पाहा केआरकेने केलेले ट्विट

मी सुखरूप माझ्या घरी परतलोय…

केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘मीडिया नवीन स्टोरी तयार करत आहे. मी सुखरूप माझ्या घरी परतलो आहे. मला कोणाकडून बदला घेण्याची गरज नाही. माझ्यासोबत जे काही वाईट घडले ते सर्व मी विसरलो आहे. ते माझ्या नशिबातच लिहिलेले असेल असे मला वाटते आहे…2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटसाठी मुंबई पोलिसांनी केआरकेला 30 ऑगस्ट रोजी अटक केली होती.

माझ्यासोबत जे काही घडले ते मी विसरलो…

जामीन मिळाल्यानंतर केआरके नेमके काय ट्विट करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरूवातीला जामीन मिळाल्यावर केआरकेने एक ट्विट केले होते, त्यामध्ये लिहिले होते की, मी बदला घेण्यासाठी परत आलो आहे. मात्र, त्यानंतर केआरकेने जे दुसरे ट्विट केले त्यानंतर सर्वांना मोठा आर्श्चयाचा धक्काच बसलाय…कारण दुसऱ्या ट्विटमध्ये केआरकेने जे घडले ते मी विसरलो असल्याचे म्हटले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.