12th Man | ‘दृश्यम’च्या दिग्दर्शकासोबत पुन्हा जोडी जमली, मोहनलाल यांच्या नव्या थ्रिलरची घोषणा
मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ सर्वप्रथम 2013 मध्ये 'दृश्यम' चित्रपटासाठी एकत्र आले. त्यानंतर 'दृश्यम 2' चित्रपटासाठीही त्यांची जोडी यशस्वी ठरली.
मुंबई : ‘दृश्यम’ (Drishyam) सीरीजच्या अभूतपूर्व यशानंतर प्रख्यात अभिनेते मोहनलाल (Mohanlal) आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ (Jeethu Joseph) पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. ‘ट्वेल्थ मॅन’ (12th Man) या गूढपटाची घोषणा मोहनलाल यांनी ट्विटरवरुन केली. त्यानंतर Drishyam, Mohanlal आणि 12thMan हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होताना दिसत आहेत. (Actor Mohanlal teams up with Drishyam director Jeethu Joseph for upcoming Movie 12th Man)
चौथ्यांदा जीतू-मोहनलाल एकत्र
मोहनलाल आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ सर्वप्रथम 2013 मध्ये ‘दृश्यम’ चित्रपटासाठी एकत्र आले. त्यानंतर ‘दृश्यम 2’ चित्रपटासाठीही त्यांची जोडी यशस्वी ठरली. हा सिनेमा 2021 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. सध्या मोहनलाल आणि जीतू जोसेफ हे ‘राम’ (Ram) चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. अशातच या ब्लॉकबस्टर अभिनेता-दिग्दर्शक जोडीने ‘ट्वेल्थ मॅन’ या मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाची घोषणा करुन चाहत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
मोहनलाल यांचे ट्वीट
“जीतू जोसेफसोबत माझा आगामी चित्रपट 12th Man ची घोषणा करताना मला अत्यानंद होत आहे. आशिर्वाद सिनेच्या बॅनर अंतर्गत अँटनी पेरंबवूर (Antony Perumbavoor) या सिनेमाची निर्मिती करत आहेत” अशी माहिती मोहनलाल यांनी दिली. राम चित्रपटाच्या शूटिंगनंतरच या सिनेमाला सुरुवात होईल.
Happy to announce my upcoming movie ’12th MAN’ with #JeethuJoseph, produced by @antonypbvr under the banner @aashirvadcine. pic.twitter.com/nPdNK7IBlk
— Mohanlal (@Mohanlal) July 5, 2021
मोहनलाल यांचं दिग्दर्शन असलेला ब्रो डॅडी (BRO DADDY) हा दुसरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. कौटुंबिक मनोरंजन देणारा हा सिनेमा असल्याचं त्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या :
Drishyam 2 Movie Review : ‘पटकथेतल्या कथेचा बाप खेळ’, दृश्यम 2 कसा आहे?
(Actor Mohanlal teams up with Drishyam director Jeethu Joseph for upcoming Movie 12th Man)