Nandamuri Balakrishna | अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांना कोरोनाची लागण, होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू!
अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवर देण्यात आली होती. त्यांच्या पीआर टिमने याबाबत माहिती दिली. अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांच्या पीआर टीमने उपचार घेतलेल्या नंदामुरी बालकृष्ण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. सर्व खबरदारीचे पालन करून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.
मुंबई : दाक्षिणात्य अभिनेते नंदमुरी बालकृष्ण (Nandamuri Balakrishna) यांना कोरोनाची लागण झालीयं. नंदामुरी बालकृष्ण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांच्या पीआर टिमने ट्विट करत दिलीयं. माहितीनुसार, अभिनेते नंदमुरी यांना कोरोनाची (Corona) सध्या कोणतीही लक्षणे नाहीयेत. नंदमुरी हे घरीच उपचार घेत असून डाॅक्टरांच्या संपर्कात देखील आहेत. नंदमुरी यांच्या पीआर टिमने विनंती केली आहे की, नंदमुरी यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. नंदमुरी हे होम आयसोलेशनमध्ये (Home isolation) आहेत. देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मोठ्या शहरांमध्ये तर कोरोनाच्या रूग्णांचा आकडा सातत्याने वाढतांना दिसतो आहे.
नंदमुरी बालकृष्ण यांच्या पीआर टिमने शेअर केलेले ट्विट
अभिनेते नंदमुरी बालकृष्ण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांचे चाहतेही चिंतेत आहेत. दरम्यान, एका युजरने लिहिले की, लवकर बरे व्हा आणि लवकर परत या. दुसर्या एका चाहत्याने लिहिले आहे की, आम्ही तुम्हाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. वर्क फ्रंटवर अभिनेता नंदामुरी बालकृष्णाच्या चॅट शो अनस्टॉपेबल विथ एनबीकेचा दुसरा सीझन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. शो अनस्टॉपेबल विथ NBK ने सीझन 1 मध्ये महेश बाबू, अल्लू अर्जुन, मोहन बाबू, रवी होस्ट केले आहेत.
ट्विट शेअर करत पीआर टीमने दिली माहिती
अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्विटरवर देण्यात आली होती. त्यांच्या पीआर टिमने याबाबत माहिती दिली. अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांच्या पीआर टीमने उपचार घेतलेल्या नंदामुरी बालकृष्ण यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. सर्व खबरदारीचे पालन करून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची चाचणी करून घेण्यास देखील सांगण्यात आले आहे.