मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी हे बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. आता नवाजुद्दीन यांनी बाॅलिवूडच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांविषयी मोठे विधान केले आहे. इतकेच नाहीतर चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करतो किंवा किती कमाई करतो. याकडे अभिनेत्याने लक्ष देण्याचे काहीच कारण नसल्याचे देखील म्हटले आहे. आपण आपले काम पुर्ण मेहनतीने करायला हवे. बाॅक्स ऑफिसवर चित्रपट हीट ठरतो की नाही याकडे कशाला लक्ष द्यायचे. इकतेच नाहीतर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, कधीच छोट्या बजेटवाले चित्रपट फ्लाॅप जात नाहीत.
नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाले की, काही बाॅलिवूड अभिनेते एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी फी घेतात आणि मग चित्रपटाचे बजेट वाढते. परत मग चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जातो. मुळात इतकी फी घेतली नाहीतर कशाला चित्रपटाचे बजेट वाढेल.
आजकाल अनेक अभिनेत्यांना चित्रपट फ्लाॅप जाण्याचे टेन्शन असते. मात्र, नेहमी बिग बजेटवालेच चित्रपट हे फ्लाॅप जातात. कमी बजेटवाले चित्रपट नाही. बाॅलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांची फी 100 कोटी एका चित्रपटासाठी आहे.
नवाजुद्दीन पुढे म्हणाले की, कोणताही चित्रपट त्याच्या बजेटच्या पुढे ज्यावेळी जातो, त्याचवेळी तो फ्लाॅप जातो. अभिनेते, दिग्दर्शक, कथाकार कधीच फ्लॉप होत नाहीत. चित्रपटाचे बजेट नेहमीच हीट आणि फ्लाॅप असते. जो अभिनेता चित्रपटाच्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर लक्ष देतो तो नेहमीच भ्रष्ट असतो.
काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुराना देखील म्हणाला होती की, माझे चित्रपट फ्लाॅप गेले तरीही इतके जास्त नुकसान होत नाही कारण मुळातच माझे चित्रपट हे फार कमी बजेटचे असतात.