Paresh Rawal Corona | 18 दिवसांपूर्वी लसीचा पहिला डोस, अभिनेते परेश रावल कोरोना पॉझिटिव्ह
त्यांच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Paresh Rawal Corona Positive)
मुंबई : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. या यादीत आता अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांचेही नाव सहभागी झाले आहे. परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Actor Paresh Rawal Tested Corona Positive)
चाहत्यांकडून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा
दुर्दैवाने, माझी कोव्हिडची सकारात्मक चाचणी आली आहे. गेल्या दहा दिवसात माझ्याशी संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया त्यांची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे ट्वीट परेश रावल यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटनंतर अनेक चाहत्यांनी त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Unfortunately, I have tested positive for COVID-19. All those that have come in contact with me in the last 10 days are requested to please get themselves tested.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 26, 2021
(Actor Paresh Rawal Tested Corona Positive)
9 मार्चला कोरोना लस
दरम्यान परेश रावल यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांनी लस घेतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. V for vaccines, सर्व डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि शास्त्रज्ञांचे आभार, असे ट्वीट त्यांनी केले होते. परेश रावल यांनी 9 मार्चला कोरोना लस घेतली होती. त्यानंतर 18 दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
V for vaccines. ! Thanks to All the Doctors and Nurses and the front line Health care workers and The Scientists. ?Thanks @narendramodi pic.twitter.com/UC9BSWz0XF
— Paresh Rawal (@SirPareshRawal) March 9, 2021
शर्माजी नामकीनमध्ये दिसणार
दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा शर्माजी नामकीन हा शेवटचा चित्रपट येत्या 4 सप्टेंबरला प्रदर्शित केला जाण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप या चित्रपटाचे शूटींग बाकी आहे. परेश रावल हे ऋषी कपूर यांच्या उर्वरित चित्रपटाचे भाग पूर्ण करणार आहे. या चित्रपटात एका 60 वर्षांच्या माणसाची कथा दाखवण्यात येणार आहे. मॅकगाफिन पिक्चर्ससोबत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर या चित्रपटाची निर्मित करत आहेत. तर हितेश भाटिया याचे दिग्दर्शन करत आहेत. (Actor Paresh Rawal Tested Corona Positive)