रणदीप हुड्डा रुग्णालयात दाखल; डॉक्टरांकडून अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

अचानक असं काय झालं, ज्यामुळे रणदीप हुड्डा याला तात्काळ रुग्णालयात करावं लागलं दाखल; चाहत्यांकडून चिंता व्यक्त, चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत रणदीपची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना

रणदीप हुड्डा रुग्णालयात दाखल; डॉक्टरांकडून अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
रणदीप हुड्डा रुग्णालयात दाखल; डॉक्टरांकडून अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Jan 14, 2023 | 8:42 AM

मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डा याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. अभिनेत्याला मुंबई येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घोडेस्वारी करतना अचानक चक्कर आल्यामुळे रणदीप बेशुद्ध झाला. ज्यामुळे अभिनेता गंभीर जखमी देखील आहे. रिपोर्टनुसार, रणदीप याच्यासोबत ही धक्कादायक घटना घडल्यानंतर अभिनेत्याला काही वेळाने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अभिनेत्यावर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांना रणदीप याला काही दिवस बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे.

सांगायचं झालं तर, याआधी देखील रणदीप जखमी झाला होता. याआधी देखील त्याच्या गुडघ्यांना गंभीर जखम झाली होती. अभिनेता सलमान खान स्टारर ‘राधे’ सिनेमात एक ऍक्शन सीन शूट करताना रणदीप गंभीर जखमी झाला होता. ‘राधे’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाल्यानंतर अभिनेत्याच्या उजव्या पायाची सर्जरी करण्यात आली होती.

आता पुन्हा घोडेस्वारी करताना अभिनेता जखमी झाला आहे. रणदीपच्या गुडघे गंभीर जखमी झाले आहे. आता पुन्हा रणदीप याच्या गुडघ्यांची सर्जरी करावी लागले असं सांगण्यात येत आहे. म्हणून चाहते अभिनेत्यासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या सर्वत्र रणदीपची चर्चा सुरु आहे.

रणदीपचे सिनेमे ‘कॅट’ या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनयाने रणदीप हुडाने प्रेक्षकांची मने जिंकली. आता रणदीप आगामा सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. रणदीप साई कबीरच्या ‘मर्द’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. सिनेमा ६ मे रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे.

‘मर्द’ सिनेमासोबतच रणदीप अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिच्यासोबत ‘अनफेअर अँड लव्हली’ या सिनेमात देखील दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन बलविंदर सिंग जंजुआ यांनी केले आहे. यासोबतच रणदीप ‘रॅट ऑन अ हायवे’ आणि ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या सिनेमांमध्ये देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.