रणवीर सिंहने पोलिसांसमोर न्यूड फोटोसंदर्भात केला मोठा खुलासा, वाचा अभिनेता नेमका काय म्हणाला?

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहने 29 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या जबाबात म्हटले आहे की, ज्या फोटोमध्ये प्रायव्हेट पार्ट दिसतोय, तो फोटो मी अपलोड केलेला नाहीय. कारण मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेल्या सात फोटोंपैकी तो फोटो नाहीय.

रणवीर सिंहने पोलिसांसमोर न्यूड फोटोसंदर्भात केला मोठा खुलासा, वाचा अभिनेता नेमका काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 11:07 AM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंहचे (Ranveer Singh) न्यूड फोटोशूट खूप व्हायरल झाले होते. ज्यामुळे रणवीर सिंहच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली. इतकेच नाही तर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) रणवीर सिंहविरोधात एफआयआरही दाखल केली. मात्र, आता यासर्व प्रकरणी रणवीर सिंहने अत्यंत मोठा खुलासा केलांय. रणवीरने त्यांच्या इंस्टाग्रामवर त्याचे हे न्यूड फोटो शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली होती. न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) प्रकरणी रणवीर सिंहविरोधात मुंबई पोलिसांनी 26 जुलै 2022 रोजी एफआयआर दाखल केली होती.

न्यूड फोटोशूटमुळे रणवीरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ

रणवीर सिंहने न्यूड फोटोसंदर्भात केलेल्या नव्या खुलासाने आता या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले असून पोलिसांना वेगळ्या दिशेने आपला तपास करावा लागणार हे नक्की आहे. रणवीर सिंहने न्यूयॉर्कच्या मासिकासाठी न्यूड फोटोशूट केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यापैकी एका फोटोमध्ये रणवीरचा प्रायव्हेट पार्ट दिसत असल्याचा आरोप करण्यात आला. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासर्व प्रकरणानंतर सर्वच स्तरातून रणवीरवर टीका करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीरने केला मोठा खुलासा

न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीर सिंहने 29 ऑगस्ट रोजी नोंदवलेल्या जबाबात म्हटले आहे की, ज्या फोटोमध्ये प्रायव्हेट पार्ट दिसतोय, तो फोटो मी अपलोड केलेला नाहीय. कारण मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केलेल्या सात फोटोंपैकी तो फोटो नाहीय. कोणीतरी माझ्या फोटोंसोबत छेडछाड केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आता हा फोटो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला असून त्यात छेडछाड झाली आहे की नाही याची माहिती मिळेल. जर फोटोला छेडछाड केली असली तर रणवीरला क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. जर फोटोला छेडछाड झाली नसेल तर रणवीर सिंहच्या अडचणीमध्ये वाढ होणार हे नक्की आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.