अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट

अभिनेता संदीप नाहर (Sandeep Nahar) याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं आहे.

अभिनेता संदीप नहारची हत्या? गळ्यावर जखमा, पत्नीवर संशय, मोठं ट्विस्ट
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 2:57 PM

मुंबई : अभिनेता संदीप नहार  (Sandeep Nahar) याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवलं. मात्र, आता या सर्व प्रकरणात नवा ट्विस्टसमोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नहारच्या गळ्यावर संशयास्पद निशान आढळले आहेत. गोरेगाव पोलीस याची सखोल तपास करत आहेत. (Actor Sandeep Nahar in suicide case Big twist)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नहारने आत्महत्या केली तेव्हा पत्नी कांचन शर्माने सुतारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर तिने संदीप नहारला घराजवळच्या रुग्णालयात नेले. पण तेथील रुग्णालयाने संदीपला दाखल करून घेण्यास नकार दिला. जेव्हा ती दुसर्‍या रुग्णालयात पोहोचली तेव्हा डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले. आता या सर्व प्रकरणामध्ये पोलिसांना संशय येत आहे.

कारण संदीपच्या गळ्यावर जखमा आढळल्या आहेत. पोलिस पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा सायबर सेल संदीप नहारच्या सोशल मीडिया अकाउंटवरही चौकशी करत आहे.“आयुष्यात अनेक सुख-दु:खं पाहिली. प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न केला. पण आता मी ज्या अवस्थेतून जात आहे ते सहन करण्यापलिकडे आहे. मला माहिती आहे की आत्महत्या करणं हे भित्रेपणाचं लक्षण आहे.

मलाही जगायचं होतं. पण अशा जगण्याला काय अर्थ, जिथे शांतता आणि स्वाभिमान नाही. माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई वुनू शर्मा यांनी ना मला समजून घेतलं ना समजून घेण्याचा प्रयत्न केला. माझी बायको शीघ्रकोपी आहे. तिचा आणि माझा स्वभाव जुळू शकत नाही” अशी पोस्ट संदीपने केली होती.

“लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात सगळं बदललं”

“रोज सकाळ संध्याकाळ भांडणं. आता माझ्यात ऐकण्याची ताकद नाही. त्यात कांचनची काही चूक नाही. तिचा स्वभावच तसा आहे. तिला सर्वकाही नॉर्मल वाटतं, पण माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नाही. मी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मी खूप वाईट वेळ पाहिली पण कधी अडलो नाही. डबिंग केलं. जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो. स्ट्रगल होतं पण समाधान होतं. आज मी खूप काही मिळवलं आहे.

पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदललं आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटतं की सर्वकाही ठीक सुरु आहे. कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळं खोटं आहे. जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळं खोटं आहे”, असंही संदीपने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

संबंधित बातम्या : 

अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

(Actor Sandeep Nahar in suicide case Big twist)

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.