Shah Rukh Khan | शाहरुख खानचा बर्थडे होणार स्पेशल, चाहत्यांना मिळणार मोठे गिफ्ट

शाहरुखचा पठाण हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

Shah Rukh Khan | शाहरुख खानचा बर्थडे होणार स्पेशल, चाहत्यांना मिळणार मोठे गिफ्ट
शाहरुख खान
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 9:28 AM

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. लास्ट शाहरुख झिरो चित्रपटात दिसला होता. शाहरुखचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. शाहरुखचा पठाण हा चित्रपट (Movie) लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खान देखील मुख्य भूमिकेत असल्याने हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर (Box office) हीट ठरणार हे नक्की. मात्र, आता चित्रपटाबद्दल एक नवे अपडेट पुढे येतंय.

2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचे निर्माते शाहरुखच्या चाहत्यांना मोठे गिफ्ट देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे. म्हणजे काय तर शाहरुखचा वाढदिवस चाहत्यांसाठी अधिक स्पेशल होऊ शकतो.

शाहरुख खानच्या वाढदिवशी पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज केला जाणू शकतो, अशी एक चर्चा सुरू आहे. मात्र, यासंदर्भात चित्रपट निर्माते किंवा शाहरुख खानने कुठलेही भाष्य केले नाहीये. मात्र, शाहरुखचे पठाण चित्रपटातील लूक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पठाण चित्रपटाची चाहते वाट पाहात आहेत. शाहरुखच्या वाढदिवशी जर खरोखरच चित्रपटाचे टीझर रिलीज झाले तर ही एकप्रकारे पर्वणीच चाहत्यांसाठी ठरणार आहे. बऱ्याच वेळा शाहरुख आपला वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी दुबईला जातो. यंदा शाहरुख भारतामध्येच वाढदिवस सेलिब्रेट करणार असल्याचे कळते आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.