Jersey Film Release Date | शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, नवी तारीख काय ?

अभिनेता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या जर्सी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणीवर पडले आहे. येत्या 31 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र हा चित्रपट आता 31 डिसेंबर रोजी प्रेक्षकाच्या भेटीला येणार नाही.

Jersey Film Release Date | शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, नवी तारीख काय ?
JERSEY
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 5:57 PM

मुंबई : अभिनेता शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेल्या जर्सी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबवणीवर पडले आहे. येत्या 31 डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र हा चित्रपट आता 31 डिसेंबर रोजी प्रेक्षकाच्या भेटीला येणार नाही. विशेष म्हणजे चित्रपटाचे प्रदर्शन का लांबवण्यात आले, याबद्दल निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शाहिद कपूरचे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. मात्र आता हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

जर्सीचे प्रदर्शन लांबणीवर, ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही

जर्सी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तरीख पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं सांगितलं आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून हा चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत बोलताना ही माहिती खोटी असून जर्सी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नसल्याचंदेखील आदर्श यांनी सांगिलंय.

चित्रपट रिलीज कधी होणार ?

जर्सीचे प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर हा चित्रपट पडद्यावर नेमका कधी झळकणार असा प्रश्न विचारला जातोय. मात्र याबाबत चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. सध्यातरी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याबाबत अस्पष्टता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही महिने प्रेक्षकांना वाट पाहावी लागू शकते.

इतर बातम्या :

Mitali Mayekar | हॉट अँड क्लासिक, मिताली मयेकरचा ग्लॅमरस अंदाज पाहाच!

Sunny Leone | कंडोमची जाहिरात ते मधुबन गाणं, सनी लिओनी अन् वादांचं जुनं कनेक्शन!

Bigg Boss 15 | सगळ्या स्पर्धकांचं एकमत, रश्मी देसाई-अभिजीत बिचुकले ‘तिकीट-टू-फिनाले’च्या शर्यतीतून बाद!

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.