अखेर…सिद्धार्थ दोन पाऊले मागे! सायना नेहवालवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्यांने मागितली माफी, वाचा काय होते संपूर्ण प्रकरण…
अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थ (Siddhartha) सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये चांगलाच अडकला आहे. त्याचे झाले असे की, सिद्धार्थने बॅडमिंटन स्टार आणि भाजप नेत्या सायना नेहवाल (Saina Nehwal) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली.
मुंबई : अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थ (Siddhartha) सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये चांगलाच अडकला आहे. त्याचे झाले असे की, सिद्धार्थने बॅडमिंटन स्टार आणि भाजप नेत्या सायना नेहवाल (Saina Nehwal) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. सिद्धार्थच्या त्या आक्षेपार्ह वाक्यावर महिला आयोगाने दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी या प्रकरणावर म्हटले होते की, सिद्धार्थने सातत्याने महिलाविरोधी वक्तव्य करून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का बसवतो आहे.
आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाने घेतली दखल
सायना आणि सिद्धार्थचा तो वाद वाढतच गेल्या आणि यासंदर्भात सिद्धार्थने एक ट्विट करत लिहिले होते की, मी जे काही बोललो आहे, त्यामध्ये काहीही आक्षेपार्ह नाहीये. मात्र, आता सिद्धार्थ दोन पाऊले मागे आला असून याप्रकरणात त्याने सायनाची माफी देखील मागितली आहे. सिद्धार्थने त्याच्या ट्विटरवर एक पत्र शेअर केले असून त्यात त्याने बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची माफी मागितली आहे. सिद्धार्थने त्याच्या खुल्या पत्रात लिहिले आहे की, ‘प्रिय सायना’
Dear @NSaina pic.twitter.com/plkqxVKVxY
— Siddharth (@Actor_Siddharth) January 11, 2022
काही दिवसांपूर्वी तुमच्या ट्विटला उत्तर देताना मी लिहिलेल्या जोकबद्दल मी तुमची माफी मागतो आहे. मी तुमच्याशी बर्याच गोष्टींवर असहमत असू शकतो. परंतु जेव्हा मी तुमचे ट्विट वाचतो तेव्हा माझा राग शब्दांमध्ये नाही बसत. जर एखादा मजाक समजावून सांगावा लागत असेल तर तो सुरुवातीला चांगला मजाकच नाही. मी जो मजाक केला त्याबद्दल क्षमस्व आहे, जे मी नीट स्पष्ट करू शकलो नाही.
अभिनेत्याने ट्विट करत मागितली माफी
मी जो मजाक केला, त्याच्या शब्दांवर माझा जोर पाहिजे. मात्र, त्याचा हेतू इतका दुर्भावनापूर्ण नव्हता की सर्व स्तरातील लोकांनी दोषी ठरवले. मी एक कट्टर स्त्रीवादी सहयोगी आहे आणि मी तुम्हाला खरोखरच सांगू शकतो की माझ्या ट्विटमध्ये कोणतेही लिंग निहित नव्हते आणि एक स्त्री म्हणून तुमच्यावर टिप्पणी करण्याचा माझा नक्कीच कोणताही हेतू किंवा इरदा नव्हता.
सायनाचे नेमके टि्वट काय? वाचा
5 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये चूक झाली होती. त्यावरुन सायनाने एक टि्वट केलं होते. मोदींचा सुरक्षा ताफा 15 ते 20 मिनिटं पुलावर अडकून पडला होता. सुरक्षेमध्ये त्रुटी राहिल्याने पंतप्रधानांचा पुढचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यावरुन बराच वाद झाला. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्याचे समजल्यानंतर सायनाने एक टि्वट केले.
No nation can claim itself to be safe if the security of its own PM gets compromised. I condemn, in the strongest words possible, the cowardly attack on PM Modi by anarchists.#BharatStandsWithModi #PMModi
— Saina Nehwal (@NSaina) January 5, 2022
“स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड होत असेल, तर कुठलाही देश आपण सुरक्षित आहोत, असा दावा करु शकत नाही. मी कठोर शब्दात या घटनेचा निषेध करते” असे सायनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले होते. सिद्धार्थने सायनाच्या या टि्वटला लैंगिकअंगाने जाणारा अत्यंत घाणेरडा रिप्लाय दिला. त्यामुळे त्याच्यावर चाैहू बाजूने टिका होत होती.
संबंधित बातम्या :
नाव किली पॉल. काम, नुसती Instagramवर हवा करायची भाव! आता ‘Saami Saami’वर ठेका धरलाय राव