सोनू हे वागणं बरं नव्हं… रेल्वेने फटकारताच सोनू सूदचं ट्विट… म्हणाला, क्षमा प्रार्थी…

देश आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही आदर्श आहात. रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणं धोकादायक आहे.

सोनू हे वागणं बरं नव्हं... रेल्वेने फटकारताच सोनू सूदचं ट्विट... म्हणाला, क्षमा प्रार्थी...
सोनू हे वागणं बरं नव्हं... रेल्वेने फटकारताच सोनू सूदचं ट्विट... म्हणाला, क्षमा प्रार्थी...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 1:53 PM

मुंबई: अभिनेता सोनू सूद त्याच्या चांगल्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतो. कोरोना काळात त्याने ज्या पद्धतीने सढळ हस्ते लोकांना मदत केली, त्यामुळे तो अधिकच चर्चेत आला. गरीबों का दाता अशी त्याची इमेजही तयार झाली. त्यामुळे त्याना मानणारा एक मोठा वर्ग निर्माण झाला आहे. सोनू जेव्हा काही करेल तेव्हा ते चांगलंच असेल असं त्याच्या चाहत्याला वाटतंय. पण सध्या सोनू त्याच्या एका चुकीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ती म्हणजे रेल्वेमधील स्टंट. रेल्वेच्या दरवाज्यात बसून त्याने प्रवास केला. त्याचा व्हिडीओही त्याने शेअर केला. त्यामुळे त्याला नॉर्दन रेल्वेने फटकारलं आहे. तर रेल्वेने फटकारताच सोनूने रेल्वेची माफी मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य रेल्वेने सोनू सूदचा लोकल प्रवासाचा व्हिडीओ रिट्विट करून त्याला फटकारलं होतं. त्यानंतर सोनूनेही नॉर्दन रेल्वेचं ट्विट रिट्विट करून रेल्वेची माफी मागितली आहे.

क्षमा प्रार्थी… असंच बसून पाहत होतो. ज्या लाखो गरीबांचं आयुष्य अजूनही ट्रेनच्या दरवाज्यातून जाते त्यांना कसं वाटत असेल हेच पाहत होतो, असं सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच तुम्ही जो संदेश दिला, तसेच रेल्वेची व्यवस्था उत्तम केली त्याबद्दल तुमचे आभार, असं म्हणत त्याने रेल्वेचेही आभार मानले आहे.

काय आहे व्हिडीओत?

सोनू सूदचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात तो रेल्वेतून प्रवास करताना दिसत आहे. रेल्वेच्या दरवाज्यात बसून तो प्रवास करताना दिसत आहे. सोनू दरवाजात बसला आहे. रेल्वे सुसाट वेगाने धावत आहे. ती इतकी की हवेच्या झोताने सोनूचे केसही उडताना दिसत आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभागी मुसाफीर हूँ यारो… ना घर ना ठिकाना… हे गाणं ऐकायला येत आहे.

रेल्वेने काय म्हटलं?

नॉर्दन रेल्वेने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो रिट्विट केला. त्यावरून रेल्वेने सोनू सूदला फटकार लगावली आहे. देश आणि जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही आदर्श आहात. रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणं धोकादायक आहे. अशा प्रकारच्या व्हिडीओमुळे तुमच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल. कृपया असं करू नका. सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या, असं रेल्वेने म्हटलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.