Thank you Note | वरुण-नताशाचा थाटात लग्नसोहळा, लग्नानंतर फॅन्ससाठी खास मेसेज शेअर!

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan)आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांचे 24 जानेवारी रोजी लग्न झाले.

Thank you Note | वरुण-नताशाचा थाटात लग्नसोहळा, लग्नानंतर फॅन्ससाठी खास मेसेज शेअर!
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 2:37 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan)आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांचे 24 जानेवारी रोजी लग्न पार पडले. दोघांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वरुण आणि नताशाच्या लग्नात कुटुंब आणि काही खास मित्र सहभागी झाले होते. वरुण-नताशाचे लग्न अलिबागमध्ये झाले. करण जौहर, जोआ मोरानी, ​​कुणाल कोल्ही, शशांक खेतान आणि डिझायनर मनीष मल्होत्रा ​​लग्नाला उपस्थित होते. लग्नानंतर आता वरुणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. (Actor Varun Dhawan did Twitter for the fans)

ज्यामध्ये वरुण म्हणतो की, मी मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे पॉजिटिविटी मिळाली आहे. वरुण आणि नताशाच्या लग्नानंतर आता त्यांचे रिसेप्शन कुठे होणार, यावर अनेक चर्चा समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण आणि नताशा या दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन पुढील आठवड्यात मुंबईत ठेवले जाणार आहे.येत्या 2 फेब्रुवारीला मुंबईत रिसेप्शन आयोजित केले जाण्याची शक्यता आहे.

हे रिसेप्शन पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या रिसेप्शनला संपूर्ण बॉलिवूड सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाहरुख खान, कॅटरीना कैफ, जॅकलीन फर्नांडिस, श्रद्धा कपूर यांसारखे कलाकार सहभागी होऊ शकतात.नताशा दलाल एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील सेलेब्रिटींसाठी ड्रेस डिझाईन केले आहेत. तसेच वरुण धवन आणि नताशा लहापणापासूनचे मित्र आहेत. नताशाने न्यूयॉर्कमधून फॅशन डिझाईनिंगचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती मुंबईत आई -वडिलांसोबत राहते. नताशाचे वडील उद्योगपती असून आई गृहिणी आहे. विशेष म्हणजे नताशाचा आवडता अभिनेताही वरुण धवन आहे. तसेच ती स्केच आणि डॉग लव्हर आहे.

संबंधित बातम्या : 

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

‘तुझा आणि सुशांतचा फोटो पाठव’, फॅन्सची मागणी, त्यावर अंकिता लोखंडेने पाठवला ‘तो’ फोटो…

(Actor Varun Dhawan did Twitter for the fans)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.