RRR : आलियाच्या तक्रारीवर राम चरण म्हणाला, तू सुंदर आहेस म्हणून मी लाजायचो!
एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटात तीन बड्या सुपरस्टार्सना प्रमुख भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आलिया भट्ट (Actress Alia Batt) आणि साऊथचे सुपरस्टार राम चरण (Actor Ram Charan Tej) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) यात एकत्र काम करत आहेत.
मुंबई : दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या आरआरआर (RRR) या चित्रपटात बॉलिवूड आणि टॉलिवूडमधल्या तीन बड्या सुपरस्टार्सना प्रमुख भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Actress Alia Batt) आणि साऊथचे सुपरस्टार राम चरण (Actor Ram Charan Tej) आणि ज्युनियर एनटीआर (Junior NTR) एकत्र काम करत आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत चित्रपटातील कलाकारांनी एकमेकांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. यादरम्यान आलियाने तिच्या दोन्ही सहकलाकारांविरोधात तक्रार केली, ज्याचं उत्तरही तिला मिळालं.
सीतेच्या भूमिकेत आलिया आलियाने म्हणाली, की राम चरण तिच्याशी सेटवर खूप अवघडल्याप्रमाणं बोलायचा. यावर रामचरणनंदेखील गोड उत्तर दिलं. तू खूप सुंदर आहेस, म्हणून मला लाज वाटायची. राम चरणच्या या स्मार्ट उत्तरानंतर आलिया तरी काय म्हणेल? या चित्रपटात आलियानं सीतेची भूमिका साकारलीय, जी अल्लुरी सीता राम राजू (राम चरण)ची प्रेयसी बनलीय.
‘राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सेटवर एकमेकांचे पाय खेचायचे’ राम चरणची तक्रार केली असली तरी तिनं सेटवर काम करण्याचा आनंद लुटला. ती पुढे म्हणाली, की जेव्हा आम्ही आरआरआरच्या सेटवर होतो, तेव्हा राम चरण आणि ज्युनियर एनटीआर तेलुगूमध्ये बसून बोलत असत. मी त्यांना एकमेकांचे पाय ओढताना पाहायचे. पण मी तिथं आहे याकडे इग्नोर करायचे.
Thank you for showing the world of RRR so much love❤️ See you on 7th Jan, 2022. ?? #RRRMovie@ssrajamouli @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @DVVMovies @PenMovies @jayantilalgada pic.twitter.com/wXXhDFz4BO
— Alia Bhatt (@aliaa08) December 10, 2021
दिग्दर्शकाचं कौतुक चित्रपटाच्या शूटिंगच्या या संपूर्ण काळात आलिया चांगलं तेलुगुही शिकली आहे. कॉन्फरन्समध्ये आलियानं सगळ्यांना तेलुगूमध्ये शुभेच्छा दिल्या आणि ट्रेलरवर आपलं मत मांडलं. दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाचं आणि दूरदृष्टीचं कौतुक केलं. दिग्दर्शकानं असंही सांगितलं, की आलिया गेल्या एक वर्षापासून तेलुगू शिकतेय आणि आता तिला या भाषेचं चांगलं ज्ञान मिळालं आहे.
७ जानेवारीला होणार प्रदर्शित आरआरआरमध्ये आलिया भट्ट, राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अलीकडेच अजय देवगणनंही चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला हजेरी लावली होती. हा चित्रपट 7 जानेवारी 2022ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.