Death Anniversary | कधीकाळी दिलीप कुमार यांचे कपडे शिवण्याचं काम करायचे दीना पाठकांचे कुटुंब, दोन्ही लेकी देखील प्रसिद्ध अभिनेत्री!
दिग्गज अभिनेत्री दीना पाठक (Dina Pathak) यांना चाहते कसे विसरू शकतात. दीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. दीना पाठक अशाच एक अभिनेत्री होत्या, ज्या केवळ अभिनयातच नव्हे तर त्या स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय होत्या.
मुंबई : दिग्गज अभिनेत्री दीना पाठक (Dina Pathak) यांना चाहते कसे विसरू शकतात. दीना यांनी त्यांच्या कारकिर्दीत आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. दीना पाठक अशाच एक अभिनेत्री होत्या, ज्या केवळ अभिनयातच नव्हे तर त्या स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय होत्या. 11 ऑक्टोबर 2002 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अभिनेत्रीचे निधन झाले तेव्हा त्या 80 वर्षांच्या होत्या.
अभिनेत्री दीना पाठक यांच्या दोन्ही मुलीदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनेत्रीची मोठी मुलगी रत्ना पाठक शाह आणि धाकटी मुलगी सुप्रिया पाठक आहे, ज्या आजमितीला बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. चला जाणून घेऊया अभिनेत्रीशी संबंधित खास गोष्टी…
जेव्हा कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते…
दीना पाठक अशाच एक अभिनेत्री होत्या ज्यांना स्वतःहून हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष आणि वेगळे स्थान मिळाले होते. त्यांना चित्रपटांमध्ये पाहून असे वाटायचे की, या आपल्याच शेजारी राहणाऱ्या एखाद्या वृद्ध स्त्री किंवा आपली स्वतःची आजी आहे. स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असल्याबद्दल त्यांना मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून काढून टाकण्यात आले होते.
दीना यांचे पती दिलीप कुमारांचे कपडे डिझाईन करायचे!
मार्च 1979 मध्ये ‘फिल्मफेअर’ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले होते की, जेव्हा त्यांना महाविद्यालयातून बाहेर काढण्यात आले, तेव्हा त्यांनी दुसऱ्या महाविद्यालयातून बीए उत्तीर्ण केले होते. आम्ही तुम्हाला सांगू की, अभिनेत्री दीना यांचे बलदेव पाठक यांच्याशी लग्न झाले होते. त्यावेळी अभिनेत्रीचे पती मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ कपड्यांचे शिवणकाम करायचे. बलदेव पाठक त्या काळात राजेश खन्ना आणि दिलीप कुमार सारख्या मोठ्या स्टार्सचे कपडे शिवायचे.
अनेक चित्रपटांमध्ये केले काम!
दीना यांचे पती बलदेव स्वतःला भारताचे पहिले डिझायनर म्हणत असत. मात्र, एक वेळ आली जेव्हा अभिनेत्रीच्या पतीला त्यांचे दुकान बंद करावे लागले. दीना पाठक यांनी 120हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता आणि त्यांची अभिनय कारकीर्द देखील 60 वर्षांची होती. गुजराती चित्रपट आणि नाटकांमध्येही अभिनेत्रीने खूप काम केले.
‘खुबसुरत’ चित्रपटातून मिळवली एक वेगळी ओळख!
दीना यांनी अनेक विशेष चित्रपटांमध्ये काम केले होते, परंतु ‘खूबसुरत’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील विशेष चित्रपट होता. या चित्रपटात त्या एका नवीन भूमिकेत दिसल्या होत्या, ज्यात त्या गुप्ता कुटुंबाच्या कडक मालकिण म्हणून दिसल्या होत्या. गुलजार यांच्या ‘मीरा’ (1979) चित्रपटात त्यांनी राजा बिरमदेवची राणी कुंवरबाईची भूमिका साकारली होती.