अभिनेत्रीने खाल्लेल्या अर्ध्या सफरचंदाचा लिलाव; कोण होती ती प्रसिद्ध अभिनेत्री?
कोण कधी काय करेल याचा नेम नाही. पैसे कमावण्यासाठी कोण कुठला फंडा वापरेल हेही सांगता येत नाही. तुम्ही जर लिलाव पाहिले असतील तर तुम्हाला वेगवेगळे फंडे वापरलेले आढळतील. असाच एक किस्सा यापूर्वी घडला होता.
नवी दिल्ली | 26 सप्टेंबर 2023 : कधी कशाचा लिलाव होईल हे सांगता येत नाही. सेलिब्रिटी असतील तर त्यांच्या कपड्यांपासून तर चपलांपर्यंत कशाचाही लिलाव होतो आणि त्यातून बक्कळ पैसाही मिळतो. व्यक्ती जेवढी फेमस तेवढा त्याच्या वस्तुला भाव येतो. सध्या एक प्रसिद्ध अभिनेत्री अचानक चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीच्या मृत्यूने आधीच खळबळ उडालेली होती. आता तिच्या एका कारनाम्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. कोण होती ही अभिनेत्री? तिने असं काय केलं की ती चर्चेत आली?
तुम्ही अभिनेत्रींच्या साडी, चपला, ज्वेलरी आणि महागड्या वस्तूच्या लिलावाबाबत ऐकलं असेल. पण कधी अभिनेत्रीने खालेल्ल्या अर्ध्या सफरचंदाचा लिलाव झाल्याचं ऐकलंय का? निश्चितच तुम्ही असं काही ऐकलं नसेल. पण तसं घडलंय. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री विजयलक्ष्मी ऊर्फ सिल्क स्मिता हिच्या बाबतीत ते घडलं आहे. सिल्क स्मिता या शुटिंग करत होत्या. त्यावेळी त्यांनी खालेल्लं अर्ध सफरचंद चोरी झालं होतं. त्यांनी सफरचंदाचा एक बाईट घेतला आणि सफरचंद बाजूला ठेवलं होतं.
कारण दिग्दर्शकाने त्यांना एका शॉटसाठी बोलावलं होतं. तिथेच एक व्यक्ती उभा होता. त्याचं लक्ष या सफरचंदाकडे होतं. सिल्क स्मिता शुटींगमध्ये बिझी होताच त्याने हे सफरचंद पळवलं होतं. त्यानंतर या सफरचंदाचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी या सफरचंदाची बोली 1 लाख रुपये लागली होती, असं सांगितलं जातं.
सफरचंद विकला तर कितीला विकला?
काही मीडिया रिपोर्टनुसार, या व्यक्तीने दोन रुपयांत हे सफरचंद विकलं होतं. तर इतरांच्या दाव्यानुसार हे सफरचंद 200 रुपयांना विकण्यात आलं होतं. परंतु, काही मीडिया रिपोर्टनुसार त्याने हे सफरचंद 26 जार रुपये किंवा एक लाखात विकलं असावं. मात्र, नेमकं कितीला हे सफरचंद विकल्या गेलं याची माहिती नाही. परंतु, या सफरचंदाचा लिलाव झाला होता हे नक्की. त्यावेळी या सफरचंद चोरीची आणि त्याच्या लिलावाची खूप चर्चाही झाली होती.
घरातून पळाली, अभिनेत्री झाली
सिल्क स्मिताचा जन्म 2 सप्टेंबर 1960 रोजी झाला होता. ती आंध्रप्रदेशातील एका खेड्यातील राहणारी होती. तिच्या कुटुंबाची परिस्थिती हालाखीची होती. आर्थिक तंगीतच तिचं बालपण गेलं. तिच्या घरच्यांनी कमी वयातच तिचं लग्न लावून दिलं होतं. मात्र, तिचे सासरचे लोक तिचा छळ करत होते. त्यामुळे ती घरातून पळून गेली होती.
त्यानंतर तिने पैसे कमावण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. सुरुवातीला तिने मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. त्यानंतर तिने सिनेमात छोटेमोठे रोल करण्यास सुरुवात केली. तिने अवघ्या 17 वर्षाच्या कारकिर्दीत 450 सिनेमात काम केलं होतं. विद्या बालन हिचा डर्टी पिक्चर हा सिनेमा सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारीत आहे. 23 सप्टेबर 1996मध्ये तिचा मृत्यू झाला होता.