Kangana Ranaut | पठाण चित्रपटावर कंगना राणावत हिने व्यक्त केले परखड मत, म्हणाली तरीही

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवू़डचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करू शकत नसतानाच पठाण चित्रपटाने चांगली कामगिरी करण्यास सुरूवात केलीये.

Kangana Ranaut | पठाण चित्रपटावर कंगना राणावत हिने व्यक्त केले परखड मत, म्हणाली तरीही
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 2:38 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये परत एकदा धडाकेबाज पुनरागमन केले आहे. पठाण चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसतयं. चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसतोय. या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेमध्ये आहे. पठाण (Pathaan) चित्रपटाने ओपनिंग धमाकेदार करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू होता. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत थेट हिंदूच्या भावना दुखावल्याचा आरोप केला होता. सोशल मीडियावरही या चित्रपटाविरोधातील रोष सातत्याने वाढताना दिसत होता.

25 जानेवारीला पठाण हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. इतकेच नाहीतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने चित्रपटगृहांना थेट नोटीस देऊन टाकल्या होत्या.

हा सर्व वाद चित्रपटासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे. कारण चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून १०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. शाहरुख खान याच्या चित्रपटाची धमाकेदार कामगिरी बघितल्यानंतर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवू़डचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास धमाका करू शकत नसतानाच पठाण चित्रपटाने चांगली कामगिरी करण्यास सुरूवात केलीये. करण जोहर याने देखील पठाण चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे काैतुक करत एक पोस्ट शेअर केली होती.

नुकताच बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील एक पोस्ट सोशल मीडियावर पठाण चित्रपटाविषयी शेअर केली आहे. कंगना राणावत हिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, पठाण यशस्वी होऊ शकतो, पण तरीही देश ‘जय श्री राम’ चा जयघोष करेल. भारताचे प्रेम आणि सर्वसमावेशकता हेच शाहरुख खान याच्या स्टारर चित्रपटाला जबरदस्त यश मिळवून देत आहे.

कंगना राणावत हिने दावा केला आहे की, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा चित्रपट आपला शत्रू देश पाकिस्तान आणि SIS बद्दल काही चांगल्या गोष्टी दाखवत आहे. द्वेष आणि काही गोष्टींच्या पलीकडे असलेली ही भारताची भावनाच त्याला महान बनवते… भारताच्या प्रेमानेच द्वेष आणि शत्रूंच्या राजकारणावर विजय मिळवला आहे.

Non Stop LIVE Update
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...