तुम्हारी बॉडी देखना चाहता हूं, अभिनेत्रीने केली साजिद खानसह बॉलिवूडची पोलखोल
कनिष्का आता भारतात राहत नाही. ती हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. देश सोडण्याबाबतही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली. 2019नंतर इथे राहू नये असं मला वाटलं.
मुंबई: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक साजिद खान (sajid khan) याच्या मागचं शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाहीये. दीया और बाती हम फेम (Diya Aur Baati Hum) अभिनेत्री कनिष्का सोनी हिने साजिद खानसह बॉलिवूडची पोलखोल केली आहे. कनिष्का सोनीने (Kanishka Soni) साजिदवर सेक्सुअली हॅरेस केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तर कनिष्काच्या या आरोपाने साजिद खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
अभिनेत्री कनिष्का सोनीने ‘आजतक’शी बोलताना हा धक्कादायक आरोप केला आहे. साजिद खान मला म्हणाला, तुझी फिगर मी पाहिली आहे. ऊंची आणि बॉडी चांगली आहे. तु लीड रोल करू शकतेस. फक्त टी शर्ट वर करून मला तुझं पोट दाखव. मला तुझी बॉडी बघायची आहे. हे ऐकून मला धक्का बसला. मी घाबरून गेले. एक सिनेमा मिळवण्यासाठी मला हे सर्व करावं लागेल याची मला कल्पनाही नव्हती. मी एवढं शिक्षण घेतलं आहे. त्या बेसिसवर मी दुसरं काही तरी केलं असतं. मला मोठी स्टार होण्यासाठी कुणाच्या मदतीची गरज नव्हती, असं कनिष्का म्हणाली.
मी साजिदला दुसऱ्यांदा पुन्हा भेटले. मला वाटलं माणसं बदलतात. मी त्या प्रकारची मुलगी नाही असं त्यांना वाटेल असं मला वाटलं होतं. ते मला सपोर्टिंग एक्ट्रेस म्हणून रोल देऊ शकले असते. मी दुसऱ्यांदा त्यांना हे सांगण्यासाठी भेटले. चांगला निर्माता, दिग्दर्शक मला मिळेल अशी मला आशा होती. मात्र, ज्याने डिमांड केली नाही, असा इंडस्ट्रीत मला कोणी मिळाला नाही.
लीड एक्ट्रेसलाही रातोरात निर्माता किंवा दिग्दर्शकाची गर्लफ्रेंड म्हणून रिप्लेस केले जात होते. या सर्व गोष्टींमुळे मी घाबरले होते. गेली 15 वर्ष मी या गोष्टी सहन करत आले आहे. आता अधिक सहन करण्याची माझ्यात हिंमत नाहीये, असंही ती म्हणाली.
बिग बॉसमध्ये येऊन साजिदचं सत्य मांडणार का? असा सवाल केला असता त्यावरही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली. बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळेल तेव्हाही मी भारतात येणार नाही. कारण एक शो झाला नाही तर लगेच मला दुसऱ्या शोसाठी ट्रॅप केलं जाईल.
कारण मी मोठमोठ्या लोकांची नावं घेतली आहेत. खरं सांगायचं म्हणजे माझा भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही. कारण लोकांना अभिनेत्रींच्या प्रत्येक गोष्टीत पैसा आणि प्रसिद्धी असल्याचं वाटतं, असंही ती म्हणाली.
कनिष्का आता भारतात राहत नाही. ती हॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहे. देश सोडण्याबाबतही तिने प्रतिक्रिया व्यक्त केली. 2019नंतर इथे राहू नये असं मला वाटलं. ज्या बिग बॉस शोमध्ये साजिदला सिलेक्ट करण्यात आलं, त्याची व्हॅल्यू तरी काय आहे?
मला तर या रिअॅलिटी शोमध्ये या पूर्वीही कोणताच इंटरेस्ट नव्हता. मी कधी हा शो पाहिला नाही. हा शो सर्व जग पाहते. त्यामुळे किमान चांगल्या लोकांना तरी सिलेक्ट केलं जावं, असं मला वाटतं. जे लोक करप्शन करतात त्यांना अधिक भाव दिला जाऊ नये, असंही ती म्हणाली.