पती अनुपमपेक्षाही किरण खेर अधिक श्रीमंत! महागड्या गाड्या, सोनं पाहा एकूण संपत्ती किती…

राजकारणी आणि अभिनेत्री असणाऱ्या किरण खेर या पती-अभिनेते अनुपम खेर यांच्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 30.88 कोटींची संपत्ती आहे.

पती अनुपमपेक्षाही किरण खेर अधिक श्रीमंत! महागड्या गाड्या, सोनं पाहा एकूण संपत्ती किती...
अनुपम खेर आणि किरण खेर
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 4:04 PM

मुंबई : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. फिल्मी जगापासून ते राजकीय जगापर्यंत किरण खेर यांनी आपली जादू दाखवली आहे. आज (14 जून) या अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. 14 जून 1955 रोजी पंजाबच्या चंदीगडमध्ये जन्मलेल्या किरण यांनी बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारली आहे. त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत (Actress Kirron Kher net worth is greater than anupam kher net worth).

किरण खेर यांनी 1973 साली ‘असर प्यार दा’ या पंजाबी चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात डेब्यू केला होता. त्यानंतर तिने पती अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्याबरोबर ‘पेस्टनजी’ या चित्रपटात काम केले. 1990 मध्ये किरण यांनी दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘सरदार बेगम’ या चित्रपटासह पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यात त्यांच्या अभिनयाची आणि त्यांच्या सौंदर्याची भुरळ लाखो चाहत्यांना पडली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहोत, ज्या ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

दुप्पटी संपत्तीच्या ‘मालकीण’

राजकारणी आणि अभिनेत्री असणाऱ्या किरण खेर या पती-अभिनेते अनुपम खेर यांच्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे 30.88 कोटींची संपत्ती आहे. पती अनुपम खेर यांच्या संपत्तीपेक्षा ही जवळपास दुप्पट आहे. किरण खेर यांच्याकडे 16.97  कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे आणि 13.91 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

बक्कळ दागिने

दुसरीकडे जर आपण अनुपम खेर याच्या संपत्तीबद्दल बोललो तर, त्यांच्याकडे एकूण 16.61 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. इतकेच नाही तर, किरण खेर यांना महागड्या वाहनांचीसुद्धा आवड आहे. त्याच्याकडे 61.08 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ कार आहे. त्याचबरोबर त्यांच्या एकूण मालमत्तेत 4.64 कोटी रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा देखील समावेश आहे.

कर्करोगाची लागण

किरण खेर यांनी या ‘प्रतिमा’, ‘गुब्बारे’, ‘इसी बहाने’ अशा अनेक दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे. कलर्स वाहिनीवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमाच्या परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. सध्या त्या रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. जगभरातील चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर, किरण खेरच्या प्रकृतीविषयी चाहत्यांना अपडेट देत असतात.

(Actress Kirron Kher net worth is greater than anupam kher net worth)

हेही वाचा :

Photo : बॅक टू ब्लॅक म्हणत शॉर्ट स्कर्टमध्ये हुमा कुरेशीचा बोल्ड अवतार, पाहा फोटो

Sushant Singh Rajput Death Anniversary | ‘फिर मिलेंगे चलते चलते…’, अंकिता लोखंडेने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी!

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.