मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली आणि कुब्रा खान गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल राजा याने यूट्यूब चॅनलवरून अत्यंत मोठा दावा केला आहे. यामध्ये त्यांनी हनी ट्रॅपचा आरोप थेट काही अभिनेत्रींवर केल्याने मोठी खळबळ उडालीये. आदिल राजाच्या या दाव्यानंतर आता अनेक चर्चांना उधाण दिले आहे. आदिल राजाने जरी अभिनेत्रींचे थेट नावे घेतली नसतील तरीही त्याने त्यांची नावे कोडमध्ये सांगितली आहेत. जसे की, MH, MK, KK, SA…यावरून लोकांना समजले आहे की, आदिल राजा नेमक्या कोणत्या अभिनेत्रींबद्दल बोलत आहे.
आदिल राजा याने केलेल्या आरोपांमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आणि खरोखरच या अभिनेत्री हनी ट्रॅपमध्ये सहभागी आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय. आदिल राजा याने हा व्हिडीओ त्याच्या युट्युब चॅनलवर शेअर केलाय.
आदिल राजा ‘सोल्जर स्पीक्स’ नावाने एक यूट्यूब चॅनल चालवतो. आता आदिल राजा याच्या या व्हिडीओनंतर अभिनेत्रींनी चांगला समाचार घेतला आहे. कुब्रा खान आणि महविश हयात यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये.
आदिल राजा याने म्हटले होते की, काही पाकिस्तानी अभिनेत्री आणि मॉडेल जनरल निवृत्त बाजवा आणि माजी आयएसआय प्रमुख फैज हमीद यांच्यासोबत राजकारण्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी काम करत होत्या.
कुब्रा खानने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले की, यासर्व प्रकरणात मी सुरूवातीला शांत बसले होते. कारण अशा खोट्या व्हिडीओंमुळे मला काही फरक पडत नाही, असे मला वाटत होते.
कुब्रा खानने पुढे म्हटले की, तुम्ही जो दावा केला आहे. त्याचे पुरावे देण्यासाठी मी तुम्हाला तीन दिवसांचा वेळ देते. जर तुम्ही हे करू शकले नाही तर जाहिर माफी मागा. जर तुम्ही तसे केले नाही तर मी तुमच्यावर बदनामीचा दावा करेन.