मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीची स्वप्नसुंदरी म्हटली की असंख्य चाहत्यांच्या समोर चटकन देखणा चेहरा उभा राहतो, अर्थात तो चेहरा म्हणजे अभिनेत्री मधुबाला (Madhubala). आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने असंख्य चित्रपट रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री. मधुबाला अर्थात मुमताज जहान बेगम नहलवी हिची आज 89 वी जयंती (Birthday). ती बेबी मुमताज म्हणूनही परिचित होती. ह्या स्वप्नसुंदरीचा जन्म 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचे बालपणीचे नाव मुमताज जहाँ देहलवी होते. 1942 मध्ये ‘बसंत’ चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरची सुरुवात केली. मधुबाला दिसायला जेवढी सुंदर होती, तितकीच ती एक उत्तम अभिनेत्री होती. तिचा अभिनयही प्रचंड दमदार होता. त्यामुळे सौंदर्य आणि त्याला उत्तम अभिनयाची साथ अशा जोरावर मधुबालाने चित्रपटसृष्टीतील असंख्य चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. तिचे मधुबाला नाव पडण्यामागेही किस्सा आहे. 1947 मध्ये ‘नील कमल’ चित्रपटातील तिचा अभिनय पाहून त्यावेळच्या प्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी यांनी तिचे नाव ‘मधुबाला’ ठेवण्याचा सल्ला दिला होता. तेव्हापासून ती मधुबाला म्हणून प्रसिद्ध झाली. मधुबालाच्या सौंदर्याची 1940च्या दशकात असंख्य चाहत्यांवर जेवढी भूरळ होती, तितकीच भुरळ आजही कायम आहे. ही अभिनेत्री आज या जगात नाही, मात्र लोक आजही तिला विसरु शकलेले नाहीत. मधुबालाने मुगल-ए-आझम या चित्रपटात साकारलेली ‘अनारकली’ची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. (Actress Madhubala, who hurt the audience with her charming smile and acting, Today is her 89th birthday)
मधुबालावर बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दाम्पत्याचे मधुबालावर विशेष प्रेम होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेल्या नव्हत्या. त्यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. 1942 मध्ये ‘बसंत’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय अवघे नऊ वर्षे होते. अभिनेत्री म्हणून 1947मध्ये ‘नीलकमल’ या चित्रपटात त्या पहिल्यांदा झळकल्या होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘दिल की रानी’ हा त्यांचा दुसरा चित्रपट, तर 1948 मध्ये ‘अमर प्रेम’ चित्रपट प्रदर्शित झाला. या सर्व चित्रपटांमध्ये मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. मधुबाला यांना एकूण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला या आईवडिलांची पाचवी मुलगी होत्या. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकल्या नव्हत्या. त्यांना उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एक शब्दही बोलता येत नव्हता.
हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर मधुबाला यांनी मुघल-ए-आझम, चलती का नाम गाडी यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर त्यांनी केवळ हिंदी चित्रपट विश्वावरच नव्हे तर लाखो हृदयांवर अधिराज्य केले. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या पंक्तीत त्यांचे नाव घेतले जाते. मधुबाला यांचे नाव त्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे, ज्यांच्या भूमिकेमुळे चित्रपट ओळखला जातो. त्यांनी आपले आयुष्य चित्रपटाच्या नावावर समर्पित केले.
मधुबाला यांनी त्यांच्या काळात अशोक कुमार, रहमान, दिलीप कुमार आणि देवानंद यांसारख्या दिग्गज कलाकार मंडळींसोबत काम केले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. त्यांच्या प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर उंचावत गेला होता. अभिनयात नेहमीच स्वतःला सर्वोत्कृष्ट सिद्ध केलेल्या मधुबाला यांनाही काहीवेळेला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र त्यात त्या खचल्या नाहीत. 1950 मध्ये त्यांचे काही चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यावेळी त्यांचे चित्रपट केवळ त्यांच्या सौंदर्यामुळे हिट होतात, त्यांच्यात टॅलेंट नाही, असा आरोप लोकांनी केला होता. मात्र ह्या आरोपामुळे मधुबाला यांनी स्वतःला कधी नाउमेद केलेले नाही. उलट त्यांनी आपले टॅलेंट सिद्ध करून आरोप करणाऱ्या लोकांना अंतर्मुख व्हायला लावले. 1958 मध्ये त्यांचे ‘फागुन’, ‘हावडा ब्रिज’, ‘काला पानी’ आणि ‘चलती का नाम गाडी’ असे अनेक चित्रपट हिट झाले होते. त्यामुळे त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीवरील छाप प्रकर्षाने दिसली होती. त्यांना प्रकृतीनेही चिंतेत टाकले होते. त्यांच्या हृदयात लहानपणापासूनच छिद्र होते. 1960 मध्ये जेव्हा त्याच्या वेदना वाढल्या, त्यावेळी त्या उपचारासाठी लंडनला गेल्या होत्या. तेथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि मधुबाला 2 वर्षांपेक्षा जास्त जगू शकणार नसल्याचे सांगितले होते, परंतु मधुबाला यांना जगण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे त्यांनी दीर्घकाळ आजारपणाशी झुंज देत अभिनयही सुरु ठेवला होता.
मधुबाला यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या करिअरमध्ये 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या दमदार अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. अनेक बॉलिवूड कलाकारही त्यांच्यावर तुटून पडले होते. त्यांच्या सौंदर्याची तुलना मर्लिन मनरोशी केली गेली, इतक्या त्या दिसायला सुंदर होत्या. उत्कृष्ट अभिनयामुळे चित्रपटसृष्टीतील त्यांचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते. त्यांचे सौंदर्य पाहून त्यांना ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील शुक्र’ असेही म्हटले जाते. त्यांनी 1969 साली दिग्दर्शनात स्वतःला आजमावले. ‘फर्ज’ आणि ‘इश्क’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. पण हे चित्रपट बनू शकले नाहीत. याचवर्षात 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. (Actress Madhubala, who hurt the audience with her charming smile and acting, Today is her 89th birthday)
इतर बातम्या
दीपिकाचा ‘गहराइयां’ कंगनाला पोर्नोग्राफीसारखा का वाटतो?, म्हणून आता कंगानाच्या निशाण्यावर दीपिका…