Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून महिमा चौधरीने बदलले नाव, करिअर यशाचं श्रेय देताना म्हणाली…

लर्स टीव्हीचा डान्सिंग रिअॅलिटी शो 'डान्स दिवाने 3' च्या मंचावर पाहुणे म्हणून आलेल्या सुभाष घई (Subhash Ghai) यांना जबरदस्त सरप्राईज मिळाले आहे. हे सरप्राईज त्यांना त्यांच्या सुपरहिट चित्रपटाची अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिच्याकडून मिळाले आहे.

दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून महिमा चौधरीने बदलले नाव, करिअर यशाचं श्रेय देताना म्हणाली...
सुभाष घई
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 8:29 AM

मुंबई : कलर्स टीव्हीचा डान्सिंग रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ च्या मंचावर पाहुणे म्हणून आलेल्या सुभाष घई (Subhash Ghai) यांना जबरदस्त सरप्राईज मिळाले आहे. हे सरप्राईज त्यांना त्यांच्या सुपरहिट चित्रपटाची अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिच्याकडून मिळाले आहे. महिमाने सुभाष घई यांच्यासाठी एक खास व्हिडीओ मेसेज रेकॉर्ड करून पाठवला होता (Actress Mahima Chaudhry changes her name after Subhash ghai Suggestion know the interesting story).

महिमा म्हणाली की, ज्यांना हे माहित नाही त्यांना मी हे सांगू इच्छिते की, माझं हे नाव मला स्वत: सुभाष घई यांनी दिले आहे. व्हिडीओमध्ये महिमा म्हणत होती की, ‘जरी लोक नावात काय आहे?’, असे म्हणत असले तरी, माझ्यासाठी माझे नावच सर्वकाही आहे. या नावाने मला खूप काही दिले आहे, म्हणून मला सुभाष घई यांना ‘थँक यू’ म्हणायचे आहे.

‘एम’ ने सुरू होणारी नावे सुभाष घईंसाठी लकी!

अभिनेत्री महिमा चौधरी पुढे म्हणाली की, या सुंदर नावाने मला खूप काही दिले आहे. मला आठवते जेव्हा माझा पहिला चित्रपट जाहीर केला जात होता, तेव्हा सुभाषजींनी मला विचारले की, तुझ्या नावाचे शब्दलेखन काय आहे?’ मग महिमाने त्यांना विचारले की, तिने आता तेच नाव ठेवावे की, जुने नाव बदलले पाहिजे? यावर सुभाष घई यांनी तिला नाव बदलण्यास सांगितले.

त्यावेळी महिमाचे नाव रितु चौधरी होते. महिमाने स्वत:साठी अनेक नावे सुभाष घईंना सांगितली. परंतु, त्यांनी तिला ‘एम’ या अद्याक्षराने सुरु होणारे नाव्निव्डावे, असा सल्ला दिला होता. ‘एम’ अर्थात ‘म’ हे अक्षर त्यांच्यासाठी खूप लकी आहे.

सुभाष घई म्हणाले…

सुभाष घई यांनी महिमाला सांगितले की, त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे नावही ‘मुक्ता आर्ट्स’ आहे, ज्याची सुरुवात ‘एम’ने होते. त्यांचे सर्व चित्रपट सुपर हिट झाले आहेत. त्यांच्या पत्नीचे नावही मुक्ता आहे. त्यांनी लाँच केलेल्या बर्‍याच नायिका, त्यांची नावेही बहुधा ‘एम’ने सुरुवात होणारीच होती. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर माहिमाला तिच्या नावाबद्दलही काही रिस्क घ्यायची नव्हती. स्वत:चे नाव निवडण्याची जबाबदारी तिने खुद्द शोमॅनवर सोपवली. त्यानंतर सुभाष घई यांनी तिचे नाव ‘महिमा’ असे ठेवले. अभिनेत्री आजही याच नावाने ओळखली जाते. जगभरातील चाहते देखील तिला याच नावाने ओळखतात आणि तिच्यावर भरभरून प्रेम करतात.

(Actress Mahima Chaudhry changes her name after Subhash ghai Suggestion know the interesting story)

हेही वाचा :

Goodbye College | आता वडिलांचं स्वप्न साकार करणार, इरफान खानचा लेक बाबिलने शिक्षणाला म्हटले ‘अलविदा’

Expensive Lehenga : सोशल मीडियावर माधुरीच्या ‘टाय-डाय’ लेहेंग्याची चर्चा, या पेहरावाची किंमत माहितेय का?

प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.