Video | नोरा फतेहीच्या ऑफ शोल्डर ड्रेसने घोटाळाच केला! थेट कॅमेरासमोरच अभिनेत्री करू लागली असं काही की…

जेव्हा फॅशन सेन्सचा प्रश्न येतो आणि एखाद्या कार्यक्रमाला किंवा अवॉर्ड फंक्शनला जायचे असते, तेव्हा बॉलिवूड सौंदर्यवती अशा आऊटफिट्सची निवड करतात की, त्यांनी नेमकं काय परिधान केलं आहे, असा विचार अनेकवेळा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना पडतो.

Video | नोरा फतेहीच्या ऑफ शोल्डर ड्रेसने घोटाळाच केला! थेट कॅमेरासमोरच अभिनेत्री करू लागली असं काही की...
Nora Fatehi
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 11:32 AM

मुंबई : जेव्हा फॅशन सेन्सचा प्रश्न येतो आणि एखाद्या कार्यक्रमाला किंवा अवॉर्ड फंक्शनला जायचे असते, तेव्हा बॉलिवूड सौंदर्यवती अशा आऊटफिट्सची निवड करतात की, त्यांनी नेमकं काय परिधान केलं आहे, असा विचार अनेकवेळा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना पडतो. अभिनेत्री कधी-कधी इतका बोल्ड ड्रेस परिधान करतात की, त्यांना तो ड्रेस आणि स्वतःला सांभाळणे देखील कठीण होऊन जाते.

असाच काहीसा प्रकार अभिनेत्री नोरा फतेहीसोबत (Nora Fatehi) घडला आहे. नोरा एका अवॉर्ड फंक्शनमध्ये इतका बोल्ड ड्रेस घालून पोहोचली होती की, चक्क हळूहळू तिचा ड्रेस खालीच घसरायला लागला. यानंतर नोराने मीडियासमोर तिचा ड्रेस सरळ करायला सुरुवात केली.

कॅमेरासमोरच घडली घटना!

2018 च्या ‘लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड्स’ फंक्शनमध्ये नोरासोबत ही घटना घडली होती. या अवॉर्ड शोमध्ये नोरा नेहमीप्रमाणे बोल्ड ड्रेस परिधान करून गेली होती. ऑफ शोल्डर ड्रेस घालून नोरा रेड कार्पेटवर पोहोचताच कॅमेरे तिच्याकडे वळले.

या अवॉर्ड फंक्शनमध्ये नोरा अतिशय तंग असा क्रीम कलरचा ऑफ शोल्डर गाऊन घालून पोहोचली होती. या ड्रेसमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत होती. हा ड्रेस परिधान करून, नोरा मीडियाशी संवाद साधण्यासाठी रेड कार्पेटवर येताच अनेक वेळा तिचा ड्रेस अॅडजस्ट करताना दिसली. तर ती सावरत असतानाही तिचा ड्रेस वारंवार खाली सरकताना दिसला. व्हिडीओमध्ये नोराला पाहून हे स्पष्ट होते की, अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच अस्वस्थ झाली होती.

पाहा व्हिडीओ :

ड्रेस सांभाळत दिल्या फोटो पोज!

व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, नोराला हा ड्रेस सतत सांभाळणे कठीण जात आहे. मात्र, अभिनेत्रीने हा ड्रेस कसा तरी सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि रेड कार्पेटवर छान फोटो पोझ दिल्या. नोराच्या या व्हिडीओची त्यावेळी खूप चर्चा झाली होती. मात्र, अशाप्रकारे तिचा ड्रेस सांभाळताना अभिनेत्री उप्स मोमेंटची शिकार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही नोरा अनेकदा तिच्या ड्रेसमुळे उप्स मोमेंटला बळी ठरली होती.

हेही वाचा :

Ti Parat Aaliye | ‘ती परत आलीये’ म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? लवकरच होणार ‘ती’चा पर्दाफाश

Ankita Lokhande Vicky Jain Wedding : अंकिता लोखंडे-विकी जैन लग्नबंधनात अडकले, पाहा शाही लग्नसोहळ्याचे खास फोटो!

Binge Watch : ‘स्पायडर मॅन’पासून ते ‘पुष्पा’पर्यंत, आठवडाभर मनोरंजनाची धमाकेदार मेजवानी!

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.