Nusrat Jahan : अभिनेत्री, खासदार नुसरत जहाँ लवकरच होणार आई, रुग्णालयात दाखल
ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, आज म्हणजेच बुधवारी नुसरत जहाँला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि ती लवकरच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते. (Actress Nusrat Jahan's soon-to-be mother, TMC MP admitted to hospital)
मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) च्या खासदार नुसरत जहाँच्या (Nusrat Jahan) आयुष्यात लवकरच लहान मुलं येणार आहे. ऑनलाईन मीडिया रिपोर्टनुसार, आज म्हणजेच बुधवारी नुसरत जहाँला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि ती लवकरच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते. ही बातमी समोर आल्यानंतर आता तिचे चाहते एका चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत.
डीएनएने बंगाली भाषिक वृत्तपत्राच्या हवाल्यानं आपल्या अहवालात लिहिलं आहे की नुसरत जहाँच्या प्रसूतीची तारीख ऑगस्टच्या अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीची होती, परंतु लेबर पेनमुळे तिला 25 ऑगस्ट म्हणजेच बुधवारी एका खासगी रुग्णालयात दाखल करावं लागलं. नुसरत जहाँनं वर्ष 2019 मध्ये बिझनेसमन निखिल जैन यांच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. हा विवाह तुर्कीमध्ये झाला होता.
एक वर्षात तुटलं लग्न
यानंतर, दोघांनी कोलकात्यात एक भव्य रिसेप्शन दिलं होतं, ज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह बंगाली चित्रपट उद्योगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मात्र, हे लग्न फार काळ टिकलं नाही. या वर्षी जून महिन्यात नुसरत आणि बंगाली अभिनेता यश दासगुप्ताच्या नात्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या, त्यानंतर नुसरतनं 2020 मध्ये निखिल जैनपासून विभक्त झाल्याचा खुलासा केला होता. तुर्कीच्या कायद्यानुसार तिचं आणि निखिलचे लग्न होतं आणि ते भारतात वैध नाही असं ती म्हणाली होती.
दरम्यान, जेव्हा नुसरत जहाँच्या गरोदरपणाची बातमी समोर आली तेव्हा निखिल जैन यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. निखिलनं या गर्भधारणेपासून दूर राहून नुसरतबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या लग्नातील वादादरम्यान, जैन यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, तो आणि नुसरत जहाँ नोव्हेंबर 2020 मध्ये विभक्त झाले होते आणि त्यांनी विवाह रद्द करण्यासाठी अर्जही दाखल केला होता.
त्याच वेळी, नुसरत जहाँनं स्फोटक विधानात म्हटलं होतं की, दोघांनी तुर्की विवाह नियमन अंतर्गत लग्न केलं होतं आणि त्यांचं कायद्यानुसार भारतात नोंदणीकृत नव्हतं. त्यामुळे हे लग्न अजिबात वैध नाही. एवढंच नाही तर नुसरतनं निखिल जैनवर खात्यातून पैसे काढल्याचा आणि गैरव्यवहार केल्याचा आरोपही केला होता.
संबंधित बातम्या
Prakash Raj : अभिनेता प्रकाश राज पुन्हा बोहल्यावर, पण कुणासोबत?; कारण वाचाल तर थक्क व्हाल!