मुंबई : प्रियांका चोप्रा हिने आपल्या बाॅलिवूड करिअरची सुरूवात 2002 पासून केलीये. आतापर्यंत प्रियांकाने अनेक हीट चित्रपटामध्ये काम केले असून आपल्या अभिनयाच्या जोरावर ती आजही चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. विशेष म्हणजे आज तिची ओळख फक्त बाॅलिवूडपर्यंत मर्यादीत राहिली नसून हाॅलिवूडमध्येही प्रियांकाने आपल्या अभिनयाची छाप नक्कीच सोडलीये. अनेकदा प्रियांका ही सामाजिक विषयांवर देखील भाष्य करते. काही दिवसांपूर्वी प्रियांका भारतामध्ये आली होती.
आज जरी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रियांकाने वेगळी ओळख निर्माण केलीये. परंतू बाॅलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर प्रियांकाला काही दिवस अनेक गोष्टींचा सामना हा करावा लागला होता.
प्रियांकाचा रंग थोडा काळा असल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे प्रियांका सांगितले. इतकेच नव्हे तर तिच्या रंगावरून तिला खालच्या पातळीवर जाऊन बोलले जात होते.
प्रियांकाने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला अनेकदा काळी मांजर देखील म्हटले जात होते. परंतू मी नेहमीच विचार करायची की, मला इतरांपेक्षा जास्त मेहनत स्वत: ला सिध्द करण्यासाठी करावी लागणार आहे.
सुरूवातीच्या काळात मला वाटले की, मी सुंदर नाहीये. प्रियांका पुढे म्हणाली की, मला तासनतास सेटवर वाट पाहात बसावे लागत होते. खरोखरच ते दिवस माझ्या आयुष्यातील एक वेगळेच दिसत होते.