Saira Banu Health Update: अभिनेत्री सायरा बानो ICU मधून बाहेर, डॉक्टर म्हणाले, सायराजी डिप्रेशनमध्ये नाहीत!

वयाच्या 17 व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली.

Saira Banu Health Update: अभिनेत्री सायरा बानो ICU मधून बाहेर, डॉक्टर म्हणाले, सायराजी डिप्रेशनमध्ये नाहीत!
सायरा बानो
Follow us
| Updated on: Sep 05, 2021 | 11:11 AM

मुंबई : दिवंगत अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या पत्नी अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांची तब्येत अचानक खालावली होती. त्यानंतर त्यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सायरा बानो यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितीन गोखले म्हणाले की, ‘सायरा जी नैराश्याने ग्रस्त नाहीत आणि त्यांनी अँजिओग्राफी करण्यासही नकार दिला नाही. (Actress Saira Bano’s health improves)

ते पुढे म्हणाले की, ‘गेल्या वेळी सांगितल्याप्रमाणे अँजिओग्राफी काही दिवसांनी केली जाईल. कारण प्रथम आपल्याला त्याच्या मधुमेहावर नियंत्रण ठेवावे लागेल. डॉक्टरांनी असेही सांगितले की, सायरा जीला आता आयसीयूमधून हलवण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा त्या आता बऱ्या आहेत. तसेच सायरा बानो यांना आता डिस्चार्ज दिला जाऊ शकतो आणि त्यानंतर त्यांना पुन्हा अँजिओग्राफीसाठी रुग्णालयात दाखल केले जाईल.

वयाच्या 17 व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये शम्मी कपूरसोबत ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.

दिलीप आणि सायरा बानो यांच्या वयात 22 वर्षांचे अंतर होते. परंतु, त्यांच्या प्रेमामुळे कधीही हे अंतर त्यांच्या नात्याच्या मधे येऊ शकले नाही. सायरा बानो नेहमीच दिलीपकुमार यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी नेहमीच सिद्ध केले त्यांचे एकमेकांवरचे प्रेम खरे होते. दिलीप कुमार यांचे 7 जुलै रोजी निधन झाले. जोपर्यंत दिलीप कुमार जिवंत होते, सायरा बानो नेहमी त्यांची काळजी घेत असत. त्या सर्व वेळ दिलीप कुमार यांच्यासोबत राहायच्या. एवढेच नाही तर दिलीप कुमार यांच्या शेवटच्या दिवसातही त्या दिलीप कुमार यांच्यासोबत होत्या.

सायराजींना पाहून घायाळ झाले दिलीप कुमार

एकदा दिलीप कुमार सायरा बानो यांच्या घरी गेले होते. त्यावेळी साडी नेसलेल्या सायरा खूपच सुंदर दिसत होत्या. दिलीप कुमार त्यांना पाहून हरवून गेले आणि त्यांनी सायराजींना सांगितले की, त्या खूप क्यूट दिसत आहेत. यानंतर दुसर्‍या दिवशी दिलीपकुमार यांनी त्यांना पुन्हा फोन केला आणि सांगितले की, जेवण खूप चांगले झाले होते.

यानंतर दिलीप कुमार सायराजींना सतत भेटू लागले. यानंतर दिलीप कुमारांनी सायरा बानो यांना प्रपोज केले. 1966मध्ये दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न केले. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. लग्नाच्या वेळी सायराजींचे वय 22 आणि दिलीप कुमारांचे वय 44 होते. मात्र, त्यांनी शेवट पर्यंत दिलीप कुमार यांची साथ सोडली नाही.

संबंधित बातम्या : 

Bollywood Movies | कधी काळी शाहरुख खानने नाकारले होते ‘हे’ चित्रपट, पुढे ठरले सुपर डुपर हिट!

Kamal Haasan Net Worth : उत्कृष्ट अभिनेता असण्याबरोबरच कमल हसन निर्माता आणि दिग्दर्शकदेखील, पाहा किती संपत्तीचे मालक…

‘Bella Ciao’चा ताल अन् डालीच्या वेशात कोरोना लस घेण्याचं आवाहन, पुण्याच्या रस्त्यावर दिसणारे ‘ते’ नेमके कोण?

(Actress Saira Banu’s health improves)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.