राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मधून बाहेर?, सेटवर गैर हजेरीमुळे चर्चांना उधाण!

आता सुपर डान्सरच्या येत्या आठवड्यात शिल्पा शेट्टी या शोचा भाग असेल की छोट्यापडद्यापासून अंतर ठेवेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण लहान मुलांच्या या लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये शिल्पा शेट्टी परीक्षक म्हणून दिसणार की नाही यावर बऱ्याच चर्चा रंगत आहेत.

राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टी 'सुपर डान्सर चॅप्टर 4' मधून बाहेर?, सेटवर गैर हजेरीमुळे चर्चांना उधाण!
राज-शिल्पा
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:43 PM

मुंबई : पतीच्या अटकेनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सोनी टीव्हीच्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’च्या (Super Dancer Chapter 4) शूटिंगसाठी पोहोचली नाहीय. शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्याच्या काही तासांनंतर सुपर डान्सर चॅप्टरच्या आगामी भागाचे शूटिंग निश्चित करण्यात आले होते. मात्र, यावेळी शिल्पा शेट्टीच्या जागी करिश्मा कपूर पाहुणी परीक्षक म्हणून या शोमध्ये सामील झाली होती. करिश्मासोबत फिल्म सिटी मुंबईमध्ये गीता कपूर, अनुराग बासू यांनी शोचे शूटिंग सुरू केले आहे.

आता सुपर डान्सरच्या येत्या आठवड्यात शिल्पा शेट्टी या शोचा भाग असेल की छोट्यापडद्यापासून अंतर ठेवेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण लहान मुलांच्या या लोकप्रिय डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये शिल्पा शेट्टी परीक्षक म्हणून दिसणार की नाही यावर बऱ्याच चर्चा रंगत आहेत.

यापूर्वीही या कुटुंबासाठी शोमधून घेतला होता

ब्रेक शिल्पा शेट्टी यांच्या अनुपस्थितीबद्दल जेव्हा प्रोडक्शन हाऊसला कळले, तेव्हा त्यांनी शूट पुन्हा शेड्यूल करण्याऐवजी 3 परिक्षकांसह शूट करण्याचा निर्णय घेतला. याआधीही शिल्पा शेट्टीने सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या शूटिंगपासून ब्रेक घेतला होता. तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्या वेळी अभिनेत्री मलायका अरोरा हिने तिची जागा घेतली होती. शिल्पा शोमध्ये परत येईपर्यंत मलायका आणि टेरेंसने अनुराग बासू आणि गीता कपूर यांच्यासोबत परीक्षकपदाची धुरा सांभाळली होती.

राज कुंद्राला 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

सोमवारी रात्री राज कुंद्राला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. मंगळवारी (20 जुलै) दुपारी राज कुंद्राला न्यायालयात हजर केले असता, त्याला आणि नेरळ भागातून सकाळी अटक करण्यात आलेल्या त्याचा साथीदार रायन याला 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांकडे भक्कम पुरावे

मुंबई पोलीस आयुक्तांनी आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की, “फेब्रुवारी 2021मध्ये गुन्हे शाखा मुंबईत अश्लील चित्रपट बनवण्याबाबत आणि काही अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात 19 जुलै 2021 रोजी राज कुंद्राला अटक केली आहे. संपूर्ण रॅकेटमधील हा मुख्य दुवा आहे आणि आमच्याकडे या संदर्भात भक्कम पुरावे आहेत.”

(Actress Shilpa Shetty dropped out of ‘Super Dancer Chapter 4’ after Raj Kundra’s arrest)

हेही वाचा :

Raj Kundra Case | राज कुंद्राचा शर्लिन चोप्राबरोबर करार, ‘इतक्या’ नफ्यावर घेण्यात आला होता पुढचा निर्णय

‘त्याला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका’, राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली राखी सावंत

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.