सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणतेय, ‘त्याच्यापासून लांब राहाणं आणि न बोलणंच माझ्यासाठी उत्तम!’

अभिनेत्री सोमी अलीने (Somy Ali) आपल्या छोट्याशा कारकीर्दीत देखील बरेच नाव कमावले होते. मात्र, तिला चित्रपटांसाठी कमी आणि रिलेशनशिपममुळे अधिक चर्चेत राहण्याची संधी मिळाली.

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणतेय, ‘त्याच्यापासून लांब राहाणं आणि न बोलणंच माझ्यासाठी उत्तम!’
सोमी अली आणि सलमान खान
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 11:01 AM

मुंबई : अभिनेत्री सोमी अलीने (Somy Ali) आपल्या छोट्याशा कारकीर्दीत देखील बरेच नाव कमावले होते. मात्र, तिला चित्रपटांसाठी कमी आणि रिलेशनशिपममुळे अधिक चर्चेत राहण्याची संधी मिळाली. अभिनेत्री सलमान खान (Salman Khan) सोबतच्या नात्यामुळे चर्चेत होती. या नात्यावर ती सद्य घडीला देखील बोलत असते. पुन्हा एकदा सोमीने एका मुलाखतीत तिची जुनी व्यथा व्यक्त केली आहे.

1999 मध्ये झाला ब्रेकअप!

अभिनेत्री सोमी अलीने माध्यमांशी खास बातचीत करताना असा खुलासा केला होता की, दबंग खानने आपली फसवणूक केली होती आणि हेच त्यांच्या विभक्त होण्याचे कारण बनले होते. सोमी अली खान वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिअर करण्याची इच्छा तसेच तिचा क्रश सलमान खानशी लग्न करण्याची इच्छा घेऊन ती मुंबईत आली होती. या दरम्यान तिचे आणि सलमान खानचे सूत जुळले देखील. परंतु, 1999मध्ये त्यांचे संबंध संपुष्टात आले.

पाच वर्ष संपर्कात नाही!

टाईम्स ऑफ इंडिया सोबत खास संभाषणात अभिनेत्री सोमी अलीने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी तसेच सलमान खानबरोबर आता संबंध आहेत की नाही, याचीही चर्चा केली. सोमी म्हणाली, ‘मी सलमानशी गेली पाच वर्षे संपर्कात नाही. मला विश्वास आहे की, आपण आपल्या आयुष्यात पुढे जाणे केव्हाही चांगले आहे. मी माझ्या आयुष्यात प्रगती केली आहे आणि मला वाटते की सलमान देखील त्याच्या आयुष्यात पुढे गेला आहे. 1999मध्ये तो माझ्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात किती मैत्रीण आल्या, हे मला माहिती नाही. मी फक्त त्याला त्याच्या भविष्यकाळासाठी शुभेच्छा देऊ इच्छिते.’

‘बुलंद’ झाली डब्बाबंद!

सोमी अलीने एका खास संभाषणात सांगितले होते की, सलमानने ‘बुलंद’ या चित्रपटाने होम प्रॉडक्शनची सुरूवात केली आणि त्या काळात तो आपल्या ‘बुलंद’ चित्रपटासाठी अभिनेत्री शोधत होता. सोमी म्हणाली की, ती काठमांडूला त्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती, पण दुर्दैवाने त्यावेळी ती वयाने लहान होती आणि चित्रपट जगातात नवीन होती. निर्मात्यांसमवेत काही अडचणींमुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले होते. तिने सांगितले की, मी या चित्रपटाला माझ्या आणि सलमानच्या नात्यातील मुख्य दुवा मानते.

त्यांच्याशी संपर्क न ठेवणे माझ्यासाठी चांगले!

सोमी अली म्हणाली की, सलमानच्या संपर्कात न येणे हेच तिच्यासाठी चांगले आहे. ती म्हणाली, ‘मला माहित आहे की, सलमान खान त्याच्या स्वत:च्या एनजीओसाठी काम करतो आणि मला त्याचा अभिमान आहे. परंतु, त्याच्याशी संपर्क न ठेवणे माझ्या आरोग्यासाठी चांगले आहे. मला त्याची काळजी वाटते आणि मी हे जाणून खूप आनंदी आहे की, तो त्याच्या आयुष्यात चांगल्या ठिकाणी आहे आणि तो खूप आनंदी आहे.’

(Actress Somy Ali talks about relationship with Salman khan in her latest interview)

हेही वाचा :

Neha Dhupia Pregnant : नेहा धुपियाकडे पुन्हा ‘गुडन्यूज’, लवकरच करणार दुसऱ्या बाळाचे स्वागत!

आर्थिक संकटात असताना बॉलिवूडनेच मदत केली, राजपाल यादवने सांगितली व्यथा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.