तमन्ना भाटिया होणार मुंबईची सून, ‘या’ बिझनेसमनशी घेणार सात फेरे?
तमन्ना भाटिया हिने अत्यंत कमी वेळामध्ये आपल्या ग्लॅमर लूकने एक वेगळी ओळख निर्माण केलीये.
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री तमन्ना भाटिया संदर्भात एक मोठी बातमी पुढे येतंय. लवकरच तमन्ना लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तमन्नाच्या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे दिसत आहे. तमन्ना भाटिया हिने अत्यंत कमी वेळामध्ये आपल्या ग्लॅमर लूकने एक वेगळी ओळख निर्माण केलीये. विशेष म्हणजे तमन्नाची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. आतापर्यंत तमन्ना अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका केलीये. इतकेच नाही तर फक्त बाॅलिवूडच नाही तर अनेक साऊथच्या चित्रपटांमध्येही तमन्नाने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
तमन्ना भाटिया हिने बाहुबली चित्रपटातून स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केलीये. तमन्नाच्या चाहत्यांना प्रश्न पडला की, तमन्ना नेमकी कोणासोबत लग्न करणार आहे. तमन्ना ही एका बिझनेसमनसोबत लग्न करणार असून हे लग्न मुंबईमध्ये पार पडणार असल्याचे सांगितले जातंय.
तमन्ना ज्या बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे, तो मुंबईमधील असून हे दोघे मुंबईमध्येच लग्नबंधनात अडकणार आहेत. तमन्नाच्या लग्नाची बातमी ऐकून चाहत्यांमध्ये उत्साह दिसतो.
लग्नाबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे बोलले जात आहे. स्वत: तमन्ना ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत लवकरच शेअर करण्यासाठी असल्याचे सांगितले जातंय.
तमन्नाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच सुपरस्टार चिरंजीवीसोबत भोला शंकर या चित्रपटात दिसणार आहे. मेहर रमेश या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
14 एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती गुरुगुंडा सीता कलाम आणि बांद्रा या मल्याळम चित्रपटात दिसणार आहे. तमन्नाने अगदी कमी वयामध्ये अभिनय करण्यास सुरूवात केली होती.