फ्रायडे मूड, दिग्गज अभिनेत्रींचे 3 चित्रपट, कोण ठरणार यशस्वी?
जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट देखील रिलीज होणार आहेत. सोनाक्षी आणि कतरिनाच्या चित्रपटाची अधिक चर्चा आहे.
मुंबई : हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित डबल XL हा चित्रपट 4 नोव्हेंबर म्हणजे उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काय धमाका करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, याच दिवशी कतरिना कैफचा फोन भूत आणि जान्हवी कपूरचा मिली हे चित्रपट देखील रिलीज होणार आहेत. सोनाक्षी आणि कतरिनाच्या चित्रपटाची अधिक चर्चा आहे. जान्हवीच्या मिली चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केलीये. आता या तिन्ही चित्रपटांपैकी बाॅक्स ऑफिसवर कोणता चित्रपट हीट ठरणार हे उद्या कळेल.
सोनाक्षी सिन्हाचा चित्रपट वजन वाढल्यानंतर विशेष: मुलींना किती समस्यांचा सामना करावा लागतो, यावर आधारित आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेले वजन ही एक मोठी समस्या बनत आहे. यावरच हा चित्रपट आधारित आहे. हुमा आणि सोनाक्षीची जबरदस्त अशी काॅमेडी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. इतकेच नाही तर सोनाक्षी आणि हुमाने या चित्रपटासाठी तब्बल 20 किलो वजन वाढवले होते.
कतरिना कैफच्या फोन भूत चित्रपटात ईशान खट्टर, सिद्धांत चतुर्वेदी महत्वाच्या भूमिकेत आहेत. कतरिना या चित्रपटात एका भूताच्या भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार सोनाक्षी सिन्हाच्या चित्रपटाला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळू शकते. जान्हवी कपूरचा मिली हा चित्रपट मल्याळम चित्रपट हेलनचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवीने दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत सनी कौशलही आहे.