Adipurush | ‘आदिपुरुष’ विरोधात संतापाची लाट सुरूच, या ठिकाणी तक्रार दाखल

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये दिवाणी न्यायालयाचे वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी आदिपुरुष चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केलीये. यामुळे आता चित्रपट निर्माते ओम राऊत यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार हे नक्कीच आहे.

Adipurush | 'आदिपुरुष' विरोधात संतापाची लाट सुरूच, या ठिकाणी तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Oct 13, 2022 | 1:04 PM

मुंबई : प्रभास आणि सैफ अली खानचा बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच मोठ्या वादात सापडलाय. चित्रपटाचे टीझर रिलीज केल्यापासूनच वादाला तोंड फुटलंय. दिवसेंदिवस आदिपुरुष चित्रपटाबद्दलचा (Movie) लोकांचा रोष वाढताना दिसतोय. आता तर हे प्रकरण थेट कोर्टात गेल्याने चित्रपट रिलीज होणार की, नाही याकडे सर्वांच्या नजरा आहेत. चित्रपट निर्माते ओम राऊत, सैफ अली खान आणि प्रभासविरोधात (Prabhas) तक्रार दाखल करण्यात आलीये. इतकेच नाही तर संपूर्ण देशभरातून चित्रपटालाविरोध होतोय. अनेक ठिकाणी तर चित्रपटाचे पोस्टरही जाळण्यात आले.

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये दिवाणी न्यायालयाचे वकील हिमांशू श्रीवास्तव यांनी आदिपुरुष चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केलीये. यामुळे आता चित्रपट निर्माते ओम राऊत यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार हे नक्कीच आहे. या याचिकेवर 27 ऑक्टोबरला सुनावणी होणार असल्याची माहिती मिळतंय. चित्रपटाचे टीझर बघितल्यानंतर अनेकांचा रोष वाढतोय. चित्रपटाच्या टीझरमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत भगवान श्री रामचंद्र आणि माता सीता यांची चित्रपटात वेशभूषा चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच चित्रपटातील इतरही पात्रांबद्दल आक्षेप नोंदवण्यात आलाय. जर हा चित्रपट रिलीज झाला तर देशातील एकता आणि अखंडता खराब होऊ शकते असेही याचिकेत म्हणण्यात आले आहे. आदिपुरुष गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आदिपुरुष या चित्रपटात अभिनेता प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावण, क्रिती सॉनन ही सीता आणि देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत आहेत.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...