Adipurush Vs Raksha Bandhan : अक्षय कुमारची प्रभासशी होणार टक्कर!, 2022च्या ‘या’ दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘आदिपुरुष’ विरुद्ध ‘रक्षाबंधन’ सामना रंगणार!
‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासचा (Prabhas) बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून, तो अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला थेट स्पर्धा देणार आहे.
मुंबई : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासचा (Prabhas) बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून, तो अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाला थेट स्पर्धा देणार आहे.
शनिवारी, महाराष्ट्र सरकारने अखेर 22 ऑक्टोबर नंतर सिनेमागृहे उघडण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात चित्रपटगृहे कधी उघडली जातात याकडे सर्वांचे डोळे लागले होते. या घोषणेनंतर बॉलिवूड चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख सातत्याने जाहीर केली जात आहे. या वर्षापासून पुढील वर्षापर्यंत रिलीजच्या तारखा जाहीर झाल्या आहेत, ज्यात दोन मोठ्या स्टार्सचे चित्रपट समोरासमोर आले आहेत.
होय, या वर्षी नोव्हेंबर ते पुढच्या वर्षीचे कॅलेंडर चित्रपटांनी भरलेले दिसते. या यादीमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांचे शूटिंग अजून सुरू झालेले नाही. अशा स्थितीत काही स्टार्सचे चित्रपट एकमेकांशी भिडतील, हे अपरिहार्य आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि प्रभासच्या चित्रपटांची टक्कर आता स्पष्ट झाली आहे.
अक्षय आणि प्रभासचा चित्रपट येणार समोरासमोर!
2022मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात, आदिपुरुष आणि रक्षाबंधनाची मोठी टक्कर होणार आहे. या दिवशी अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि प्रभासचा ‘आदिपुरुष’ समोरासमोर असतील. ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची तारीख आधीच जाहीर करण्यात आली आहे की, हा चित्रपट पुढील वर्षी 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. अशा परिस्थितीत, आता अक्षय कुमार स्टारर ‘रक्षाबंधन’ची रिलीज डेटही समोर आली आहे.
पुढील वर्षी 11 ऑगस्ट रोजी ‘रक्षाबंधन’ देखील प्रदर्शित होणार आहे, आनंद एल राय दिग्दर्शित चित्रपटात, भूमी पेडणेकर सोबत अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जरी, हा चित्रपट आधी 5 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता.
कसा आहे ‘आदिपुरुष’?
प्रभास अभिनीत ‘आदिपुरुष’ हिंदीसह तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत करत आहेत. प्रभास व्यतिरिक्त सैफ अली खान, कृती सॅनन आणि सनी सिंह या चित्रपटात दिसणार आहेत. असे म्हटले जात आहे की, ‘आदिपुरुषा’ची कथा रामायणाने प्रेरित आहे.
कोव्हिड विषाणूच्या साथीमुळे चित्रपटगृहे बऱ्याच काळापासून बंद आहेत. यामुळे अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी बराच काळ वाट पाहत आहेत. परंतु आता राज्यांमध्ये आवश्यक सूचनांसह, 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहे उघडण्यात आली आहेत, ज्यात महाराष्ट्र देखील सामील झाला आहे. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपटगृह 22 ऑक्टोबरनंतर उघडण्याची घोषणा केली.
हेही वाचा :
Lookalike :हुबेहुूब रजनीकांतसारखे दिसतात कन्नन पिल्लई, अभिनेत्यासारखं दिसल्यामुळे केली भरपूर कमाई