Adnan Sami: ‘अलविदा’ म्हणत अदनान सामीने इन्स्टावरील सर्व पोस्ट केले डिलिट; चाहते पेचात!
अदनान सामीचे इन्स्टाग्रामवर (Instagram) सहा लाख 74 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अचानक त्याने सर्व पोस्ट डिलिट का केले असावेत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
गायक अदनान सामीने (Adnan Sami) इन्स्टाग्राम अकाऊंटवरील सर्व व्हिडीओ आणि फोटो डिलिट केले आहेत. हे सर्व डिलिट करण्यापूर्वी त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला. त्या व्हिडीओत ‘अलविदा’ (alvida) असं लिहिलेलं पहायला मिळतंय. त्यामुळे नेमकं काय झालं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अदनान सामीचे इन्स्टाग्रामवर (Instagram) सहा लाख 74 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अचानक त्याने सर्व पोस्ट डिलिट का केले असावेत असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अनेकांनी त्याच्या ‘अलविदा’ या पोस्टवर कमेंट्स करत चिंता व्यक्त केली आहे.
‘काय? तुम्ही ठीक आहात ना?’, असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. तर ‘कदाचित हे त्याचं नवीन गाणं असू शकतं. प्रमोशनचा फंडा म्हणून पोस्ट डिलिट केले असावेत’ असा अंदाज दुसऱ्याने वर्तवला. आता सर्व पोस्ट डिलिट करण्यामागचं नेमकं कारण खुद्द अदनान सामीच सांगू शकेल. अदनान हा मूळचा पाकिस्तानचा असून 2016 मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं. 2000 मधील ‘लिफ्ट करा दे’ या सुपरहिट गाण्यानंतर आतापर्यंत त्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क होतात. आपल्या पहिल्या अल्बममध्ये अदनानचं वजन तब्बल 230 किलो होतं. आता त्याचं वजन 75 किलो आहे. 2020 मध्ये त्याला कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
अदनानची पोस्ट-
View this post on Instagram
गेल्या महिन्यातच अदनानने मालदिवमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो पाहून अनेकांनी त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनचं कौतुक केलं. 2005 मध्ये अदनान अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला होता. काही वेळाने तो लोकांसमोर आला तेव्हा तो एकदम सडपातळ झाला होता. त्याच्यात इतका बदल झाला होता की त्याला ओळखणंही अवघड होतं. अदनानवर 2005 मध्ये लिम्फेडेमाची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर त्याला 3 महिने आराम करावा लागला होता.