तब्बल 26 वर्षानंतर ‘DDLJ’ एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार, आदित्य चोप्रा करणार संगीतमय पदार्पण!

दिग्दर्शक आदित्य चोप्राने 1995 साली 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (DDLJ) रिलीज केला होता. आता 26 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पण यावेळी ही कथा एका संगीत नाटकाच्या स्वरूपात सादर केली जाईल.

तब्बल 26 वर्षानंतर ‘DDLJ’ एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार, आदित्य चोप्रा करणार संगीतमय पदार्पण!
Aditya Chopra
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 11:44 AM

मुंबई : दिग्दर्शक आदित्य चोप्राने 1995 साली ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (DDLJ) रिलीज केला होता. आता 26 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. पण यावेळी ही कथा एका संगीत नाटकाच्या स्वरूपात सादर केली जाईल म्हणजेच म्युझिकल ब्रॉडवे.

चित्रपट निर्मात्याने याबद्दल बोलताना सांगितले की, मी ब्रॉडवे म्युझिकलबद्दल खूप चिंताग्रस्त आहे, पण तितकाच उत्साही देखील आहे.’ ते म्हणाले की, ‘मला वाटते की मी आजही 23 वर्षांचा आहे (जेव्हा मी डीडीएलजे दिग्दर्शित केला होता).’

आदित्य चोप्रा ‘कम फॉल इन लव्ह: द डीडीएलजे म्युझिकल’ लाँच करणार!

आदित्य चोप्रा म्हणाले की, ‘मी सिनेसृष्टीचा माणूस आहे, मी कधीही थिएटर केले नाही आणि मी माझ्या आयुष्यातील सर्वात विलक्षण महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. यशराज फिल्म्स दिग्दर्शित DDLJ हा भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 1995 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या ब्रॉडवे शोचे नाव आहे ‘कम फॉल इन लव: द डीडीएलजे म्युझिकल’ जो यशराज फिल्म्स निर्मित करत आहे.’

ब्रॉडवेवर संगीतकार विशाल आणि शेखर हे संगीतकार म्हणून काम करतील. या शोसाठी दिग्दर्शकाने आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमची निवड केली आहे. शोची कोरिओग्राफी टोनी, एमी विजेता रॉब अॅशफोर्ज असोसिएट कोरिओग्राफर श्रुती मर्चंट प्रॉडक्शन करणार आहे.

22 सप्टेंबर 2022 रोजी होणार वर्ल्ड प्रीमियर

‘कम फॉल इन लव्ह विथ द डीडीएलजे म्युझिकल’ 2022-2023 दरम्यान ब्रॉडवेवर प्रीमियर होईल, सप्टेंबर 2022 मध्ये सॅन दिएगोच्या ओल्ड गोल्ड थिएटरमध्ये त्याचा वर्ल्ड प्रीमियर होईल.

म्युझिकल ब्रॉडवे हा हिंदी सिनेमासारखा असून, वर्षानुवर्षे विभक्त झालेले दोन प्रेमी आहेत, असे निर्माता आदित्य चोप्रा यांचे मत आहे. जो त्याच्या ब्रॉडवे शो ‘कम फॉल इन: लव्ह द डीडीएलजे’ मध्ये पहिल्यांदा भेटणार आहेत. फार कमी लोकांना माहीत आहे की, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा पहिला इंग्रजीत बनवण्यात येणार होता, ज्यात टॉम क्रूझला नायक म्हणून घ्यायचे होते.

1985 मध्ये पाहिला होता पहिला संगीत कार्यक्रम

ब्रॉडवेच्या आठवणींना उजाळा देताना आदित्य चोप्रा म्हणाले, 1985 च्या उन्हाळ्यात मी लंडनमध्ये सुट्टी घालवत होतो. माझे वडील आणि भाऊ मला संगीत नाटकाचा अनुभव घेण्यासाठी घेऊन गेले होते. प्रकाश मंद झाला आणि जेव्हा पडदा उठवला गेला, तेव्हा मी पुढील तीन तास जे पाहिले ते पाहून मी थक्क झालो. त्यावेळी लहान होतो आणि आवडीने चित्रपट पाहायचो. पण त्या दिवशी मी स्टेजवर जे पाहिले. त्याने माझे भान हरपले. माझा विश्वासच बसत नव्हता की, असा थेट देखावा रंगमंचावर रचला जाऊ शकतो. संगीत नाटक हे आपल्या भारतीय चित्रपटांशी किती साम्य आहे, हे माझ्या मनात आले, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Urfi Javed : उर्फी जावेदने कॅरी केला ‘अनोखा’ स्लिप ड्रेस, वापरकर्ते म्हणाले – ही कपडेच का घालते?

Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी पुन्हा एकदा आर्यनच्या भेटीला

Happy Birthday Prabhas | पॅन इंडिया स्टार प्रभास, अभिनेत्याला प्रेमाने ‘डार्लिंग’ का म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.