आलिया सिद्दीकी हिच्या दाव्यानंतर आली नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली प्रतिक्रिया, वाचा नेमके सत्य काय?

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने त्याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाहीतर हे प्रकरण कोर्टात पोहचले आहे.

आलिया सिद्दीकी हिच्या दाव्यानंतर आली नवाजुद्दीन सिद्दीकी याची पहिली प्रतिक्रिया, वाचा नेमके सत्य काय?
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 8:04 PM

मुंबई : आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ शेअर केल्यानंतर मोठी खळबळ निर्माण झाली. या व्हिडीओमध्ये आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) हिने मोठा दावा केला आणि म्हटले होते की, मला आणि माझ्या मुलांना नवाजुद्दीन सिद्दीकी याने त्याच्या घरामबाहेर काढले आहे आणि ते पण मध्यरात्री. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्यावर टिका केली जात होती. गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया ही त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी हा मोठ्या वादाच्या भोवण्यात नक्कीच अडकलाय.

जो व्हिडीओ आलिया सिद्दीकी हिने शेअर केला, त्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या घराबाहेर मुलांसोबत आलिया दिसत आहे. आलिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यामधील वाद सध्या चव्हाट्यावर आलाय. आलिया हिने अनेक गंभीर आरोप अभिनेत्यावर केले आहेत. आलिया सिद्दीकी हिने शेअर केलेल्या व्हिडीओवर नवाजुद्दीन सिद्दीकी याचे म्हणणे पुढे आले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे की, नवाजुद्दीनने ते घर त्याची आई मेहरुन्निसा सिद्दीकी हिच्या नावावर केले आहे. त्यामुळे नवाजुद्दीन त्या घराशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. मेहरुन्निसाच्या केयरटेकरकडून सांगण्यात आलंय की, नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या मुलांना घरामध्ये येण्याची परवानगी आहे.

नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी यांच्यामधील वाद सतत वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया हिच्या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप केले होते. इतकेच नाहीतर आलिया हिला बेडरूम वापरू दिली जात नसल्याचे म्हटले होते. आलिया सतत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुबईतील घरामध्ये काम करणारी एक महिला कामगार दिसत होती, जिचे नाव सपना आहे. या व्हिडीओमध्ये तिने नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर काही गंभीर आरोपही केले होते. मात्र, त्यानंतर सपना हिने आपण नवाजुद्दीन सिद्दीकी सरांवरील आरोप दबाव असल्याने केले असल्याचे म्हटले होते.

आलिया सिद्दीकी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यामधील वाद थेट कोर्टामध्ये देखील पोहचलाय. दुसरीकडे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने देखील आलिया सिद्दीकी हिच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. आलिया सिद्दीकी ही दुबईमध्ये राहत होती. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी ती मुंबईमध्ये आलीये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.